मंत्रालय नोकरीप्रकरणी ‘प्रिन्स’चे पाय खोलात !

मंत्रालय नोकरीप्रकरणी ‘प्रिन्स’चे पाय खोलात !

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  सैराट चित्रपट समाप्तीपूर्वी आर्ची व परश्याचा खून करून मोठा व्हिलन ठरलेला प्रिन्स ऊर्फ सूरज पवार यास चित्रपटात अटक दाखवली नाही, परंतु सत्य जीवनात मात्र मंत्रालयात नोकरी देण्याच्या अमिषाने फसवणूक झालेल्या तरूणांच्या आणखी सात तक्रारी राहुरी पोलिसांकडे आल्या आहेत. सैराट फेम प्रिन्स ऊर्फ सूरज पवार हा पोलिस तपासणीमध्ये संगमनेरमध्ये येऊन गेल्याचे उघड झाल्याने प्रिन्सचे पाय आणखी खोलात गेल्याचे दिसत आहे.

भेंडा फॅक्टरी (ता.नेवासा) येथील तरूण महेश वाघडक याने ऐनवेळी चतुराई दाखवित बनावट कागदपत्रांद्वारे मंत्रालयामध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने तरूणांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला. यामध्ये कक्ष अधिकारी अशी बतावणी करणारा दत्तात्रय अरूण क्षिरसागर (रा. मालेगाव, नाशिक) याच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ व्हीआयपी विश्रामगृह ठिकाणी मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. त्याचा संगमनेर येथील साथीदार आकाश विष्णू शिंदे व भारतीय राजमुद्रा तसेच शासकीय शिक्के तयार करून देणारा ओमकार नंदकुमार तरटे असे तिघेजण पोलिसांच्या जाळ्यात अडकले तर चौथ्या आरोपीला बेड्या ठोकल्या.

राहुरी परिसरात मोठ्या कारवाईची शक्यता
बेरोजगार तरूणांना नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. राहुरी हद्दीत काहीजण नोकरी देण्याच्या बहाण्याने बेरोजगारांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी आहेत. राहुरी हद्दीत मोठी कारवाई होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news