नगर : ठरलं… सभापतीपद शिवसेनेला! सभागृहनेतेपद राष्ट्रवादीला

नगर : ठरलं… सभापतीपद शिवसेनेला! सभागृहनेतेपद राष्ट्रवादीला

नगर; पुढारी वृत्तसेवा : महापालिका स्थायी समितीसाठी नवीन सदस्यांची निवड झाली असून, सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महापालिकेत राष्ट्रवादी-शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) अशी सत्ता असल्याने सभापती पद शिवसेनेला तर, सभागृहनेतेपद राष्ट्रवादीला दिले जाणार आहे. तशी वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असून, सदस्य तो आदेश पाळणार असल्याचे बोलले जाते.

स्थायी समितीच्या निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागेवर नूतन सदस्य निवडीसाठी नुकतीच महापालिकेत विशेष सभा झाली. त्यात आठ नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. तर, समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीच्या आणखी एका सदस्याची निवड करण्यात आली. नगर सविवांकडून स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

28 फेब्रवारीला अर्ज वाटप होणार आहे. तर, 2 मार्च रोजी स्थायी समिती सभापती पदाची निवड होणार आहे. त्यामुळे सभापती पद नेमके कोणाला मिळणार याची सर्वांनाच उत्सुक्ता आहे. महापालिकेत राष्ट्रवादी, शिवसेना अशी युती आहे. मागील काळात राष्ट्रवादीला सभापती पद होते. त्यामुळे आता सभापतीपद शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे.

आगामी काळात होणार्‍या निवडणुका लक्षात घेऊन वरिष्ठस्तरावर तशी वाटाघाटी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. तर, सभागृहनेते पद हे शिवसेनेकडे आहे. ते पद आता राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या सदस्यांची सध्या पक्षाच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांकडे उठ-बस सुरू आहे. 2 मार्च रोजी सर्वानुमते सभापती निवड न झाल्यास मतदान घेतले जाणार असून, त्याला जुने आणि नवीन असे सोळा सदस्य मतदान करणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news