

माळवाडगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्य, जिल्हा पातळीवर विविध पुरस्कार पुरस्कार मिळविलेल्या मुठेवाडगाव ग्रामपंचायतला मॉडेल ग्रामपंचायत म्हणून सहा ग्रामपंचायतीच्या यशदा प्राशिणार्थी टीमने भेट देऊन पाहणी केली.रस्ते, पिण्याचे पाणी, सौर ऊर्जा, बंदीस्त गटार, ग्रामस्वच्छता बरोबरच शिवारातील जलसंधारणाची कामे पाहून यशदा प्रशिक्षणार्थी भारावून गेले. श्रीरामपूर तालुक्यामधील उंबरगाव, खंडाळा, माळेवाडी, वांगी खुर्द, वांगी बुद्रुक व कमालपूर या ग्रामपंचायतींंनी यशदा प्राशिक्षणामध्ये सहभाग नोंदविला. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य या पाहणी दौर्यात सामील झाले होते.
जिल्हा परिषद अहमदनगर, श्रीरामपूर पंचायत समितीच्या वतीने यशदा प्राशिक्षणार्थी पाहणीसाठी मुठेवाडगावची निवड करण्यात आली होती. गुरुवार (दि. 6) रोजी दुपारी या टीमचे मुठेवाडगाव मध्ये आगमन झाले. प्रथम मुठेवाडगाव ग्रामपंचायत पदाधिकारी व सर्वपक्षीय ग्रामस्थांनी स्वागत केले. यशदा प्रशिक्षणासाठी आलेल्या या सहा गावांमधील ग्रामपंचायतीच्या पाहुण्यांनी गावातील विविध विकास योजनांची पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायत सभागृहात सरपंच सागर मुठे यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी यशदाचे प्रशिक्षकांनी सरपंच सागर ज्ञानदेव मुठे व ग्रामसेवक एस.डी.उंडे यांच्याशी विकास कामाबद्दल चर्चा केली. यावेळी उपसरपंच विजया बाबासाहेब भोंडगे, नवनिर्वाचित ग्रामपंचयत सदस्य किशोर साठे, ग्रा. पं. सदस्या संगीता मुठे, विकास सोसायटीचे माजी चेअरमन डॉ. शंकरराव मुठे, कारेगाव भागचे व्हा.चेअरमन शिवाजी मुठे, संत तुळशीराम महाराज देवस्थानचे उपाध्यक्ष सुभाष मुठे, सचिव प्रा. रंगनाथ कोळसे, आण्णासाहेब मुठे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार यांनी मार्गदर्शन केले.