

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : मनोज जारंगे पाटील यांच्या आज होणाऱ्या विराट सभेसाठी जाणता राजा मैदानावरती उभारलेल्या स्टेजची व मैदानाची जिल्हा पोलीसप्रमुख राकेश ओला व अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी पाहणी केली. तसेच सभेसाठी येणाऱ्या समाज बांधवांच्या वाहन पार्किंगबाबत तसेच संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तसेच आयोजकांना योग्य त्या सूचनाही दिल्या.
संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावरती मराठा आरक्षणासाठी जणजागृती करणारे मनोज जरांगे पाटील यांची संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावर भव्य दिव्य असे स्टेज उभारले आहे. तसेच मैदानात महिला आणि पुरुषांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. संगमनेर शहराच्या चारही बाजूने येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या वाहन पार्किंगची व्यवस्था सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण शहरात ठिकठिकाणी भगवे ध्वज सुद्धा लावण्यात आले आहे. शिवाजीनगर जवळ मोठी कमान उभारण्यात आलेली आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावागावात जाऊन मराठा समाज बांधवांना सभेसाठी मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. जाणता राजा मैदानावरील स्टेजची तसेच समाजबांधवां साठी करण्यात आलेल्या बैठकव्यवस्थेची पाहणी जिल्हा पोलीसप्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पाहणी केली. या सभेसाठी करण्यात आलेल्या आलेल्या उपाय योजनांची सविस्तर माहिती जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांना सकल मराठा समाज आयोजक समितीच्या वतीने देण्यात आली असून समितीच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुखांचे स्वागत करण्यात आले.
संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावर होणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेच्या निमित्ताने संगमनेर शहरात होणारी गर्दी लक्षात घेता संगमनेर शहरात येणारी सर्व अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ही अवजड वाहतूक पर्यायी रस्त्याने बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात आली असून संगमनेर आगारातून बाहेर जाणाऱ्या सर्व एसटी बसेस अकोले रोड मार्गे पुणे नाशिक बाह्यवळण रस्त्याकडे वळविण्यात आल्या आहेत.
श्री भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक संगमनेर शहर
हेही वाचा