नगर : गगनगिरी महाराज सप्ताहाचा संत मिरवणुकीने श्रीगणेशा

नगर : गगनगिरी महाराज सप्ताहाचा संत मिरवणुकीने श्रीगणेशा
Published on
Updated on

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र जाखुरी येथे बुधवारपासून संत गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ संत मिरवणुकीसह घटस्थापनेने झाला. श्रीक्षेत्र खोपोली येथून आणलेल्या स्वामी गगनगिरी महाराजां च्या मूर्तीची सप्ताहस्थळी मंत्रोपचारात मूर्तीची प्रतिष्ठापना व महाआरती करण्यात आली. श्रीक्षेत्र जाखुरी येथे (दि. 9 ते16 ऑगस्ट) या कालावधीमध्ये स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह (पर्व 7 वे) सुरू झाले. जाखोरीचे ग्रामदैवत जाखाईदेवी मंदिरापासून डीजेवरील भक्ती गितांनी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भगव्या साड्या परिधान केलेल्या कलश व तुळसधारी महिला डोक्यावर तुळस व कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या.

गावात मिरवणूक मार्गावर ठिक-ठिकाणी सडा व रांगोळी काढण्यात आली. मिरवणुकीत अबालवृद्धांसह सर्व गगनगिरी महाराजांचा जय-जयकार करीत होते. मिरवणुकीत सजवलेल्या घोडागाडीसह रथामध्ये साधु-संत विराजमान झाले होते. श्रीक्षेत्र खोपोली येथून आणलेली स्वामी गगनगिरी महाराजांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. साक्षात गगनगिरी महाराजच रथामध्ये विराजमान झाल्याचा भास झाला . गगनगिरी महाराजांचे नातू शिवाजी महाराज पाटणकर यांच्या हस्ते शिवपुराण कथेचे पूजन करुन, नाशिकचे शिवपुराण कथाकार माधवदास महाराज राठी यांचा सत्कार करण्यात आला. चंद्रालेखाताई महाराज काकडे यांनी ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात केली.
मिरवणूक सप्ताहस्थळी आली असता महिला- पुरुषांनी फुगड्या खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

सप्ताहस्थळी प्रवेशद्वारातून संत गगनगिरी महाराजांच्या मूर्तीचा रथ आत प्रवेश करत असताना जीसीपीने महाराजांच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर गगन बावडा आश्रमाचे बाळू महाराज, बालगिरी महाराज, सोनगिरी महाराज, बबन महाराज सोनवणे, द्वारकादास महाराज (गुजरात), सुभाष महाराज रोडे, काशि नाथ महाराज आहेर, सयाजी महाराज, आनंदगिरी महाराज, मुंबईतील मनोरी आश्रमाचे निषाद पाटणकरबुवा पुणेकर, संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, संजय महाराज देशमुख यांच्या हस्ते महाआरती झाली. यावेळी किरण महाराज शेटे, अशोकराव कोकणे, दादासाहेब वर्पे, कपिल पवार, बाळासाहेब ताजणे, किरण घोटेकर, मनीष माळवे, संजय पुंड, शेखर गाडे, राजेंद्र देशमुख, विलास कवडे, रवी रोहम, विक्रम थोरात, संतोष मांडेकर, बाळासाहेब देशमुख, किसन पानसरे, राजेंद्र देशमुख, राजेंद्र पानसरे, नितीन पानसरे, कारभारी राहणे, सागर पानसरे उपस्थित होते.

पुराण महाकथा श्रवणाची यंदा मिळणार संधी!
संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र जाखुरी येथील गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त यावर्षी प्रथमच नाशिक येथील माधवदास महा राज राठी यांच्या सुश्राव्य वाणीतून शिव पुराण महाकथा श्रवणाची संधी परिसरातील भाविक- भक्तांना मिळत आहे. कथेच्या पहिल्या दिवशी भाविकांची उपस्थिती लक्षनिय होती.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news