नगर : दैठणे गुंजाळमध्ये 71 फुटी स्वराज्य ध्वजाचे लोकार्पण

नगर : दैठणे गुंजाळमध्ये 71 फुटी स्वराज्य ध्वजाचे लोकार्पण

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) येथे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होऊन गावातील मुख्य चौकात 71 फुटी स्वराज्य ध्वजाचे ग्रामस्थांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त गावातील तरुण मंडळांनी एकत्र येत मोठ्या उत्साहात शिवजयंती कार्यक्रमाचे नियोजन केले. सुरवातीस स्वराज्य ध्वज व छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माळकूप येथील जय बजरंग ढोलताशा पथकाने सहभाग घेत लक्ष वेधून घेतले.

मिरवणुकीनंतरछत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन, शिवराय आरती व स्वराज्य ध्वज लोकार्पण सोहळा पार पडला. सायंकाळी सात वाजता फटाक्यांची आतषबाजी व त्यानंतर शिवशाहीर सुमित धुमाळ यांचा शाहिरी शिवगर्जना पोवाड्याचा कार्यक्रम झाला. शेवटी नियोजन समितीतर्फे ग्रामस्थांना स्नेहभोजन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news