

Illegal Gutkha Seizure Akole taluka
अकोले: कोतुळ येथे १ कोटी १ लाख ७४ हजार ७५० रूपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला. १२ आरोपींना वाहनासह जेरबंद करण्यात आले. ही कामगिरी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शन खाली अकोले पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
शोएब शाविद काझी (वय २८, रा. कोतुळ, ता. अकोले, २) शाहिदहुसेन लतीफ पटेल वय ४१, रा. कोतुळ ता. अकोले) , ३) मतीन शब्बीर शेख वय ३०, रा. कोतुळ ता. अकोले, ४) जुबेर युनुस शेख वय ३०, रा. कोतुळ, ता. अकोले, ५) शहानवाज जावेद काझी वय२५, रा. कोतुळ ता. अकोले, ६) परवेज युनुस शेख वय ३१, रा. कोतुळ ता. अकोले, ७) साद अन्वर तांबोळी वय २३, रा.कासार गल्ली, ता. अकोले, ८) आतिक अन्वर शेख वय १८, रा. समशेदपुर, घोडसरवाडी ता. अकोले, ९) शाहरुख जावेद काझी वय ३०, रा. कोतुळ ता. अकोले, १०) सादिक इसानउल्ला पठाण वय ४७, रा. काझीपुरा ता. अकोले, ११) अमोल शरद जाधव वय २८, रा. काझीपुरा ता. अकोले, १२) इम्रान रौफ शेख (वय ३२ रा.कोतुळ ता. अकोले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तर पान मसाला ११० पोते (४६ हजार ४०० रूपये) रॉयल ७१७ तंबाखू ५० पोते (१० लाख) , दोन पिकअप वाहन, १ कार,१ इको चार गाडी, १ चारचाकी गाडी, १ चारचाकी गाडी, १ मोपेड गाडी अशी एकूण सात वाहने ४२ लाख, ५० हजार रुपये किमतींची, १३ मोबाईल फोन १ लाख ४७ हजार रुपयांचे तसेच ७५ हजार ३५० रोख रक्कम असा एकूण १ कोटी १ लाख ७४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेला गुटखा अकोले शहरात, समशेरपूर, कोतुळ, ब्राम्हणवाडा तसेच संगमनेर तालुक्यामध्ये पान टपरी विक्रेत्यांना विक्री करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, राजेंद्र वाघ, शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, अरविंद भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनिल पवार, दिनेश मोरे, सुनिल दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय टाकणे, दीपक जाधव, जालिंदर दहिफळे या पथकाने केली.
गुटखाबंदी यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्र येऊन गावातील व शहरातील नगराध्यक्ष,सरपंच व पोलिस पाटील यांच्यावर गुटखाबंदी यशस्वी करण्याची जबाबदारी टाकावी.
- हेरंब कुलकर्णी, अकोले तालुका व्यसनमुक्ती आंदोलन