नेवासा : मी उद्धव ठाकरेंबरोबर राहणार : आमदार शंकरराव गडाख

नेवासा : मी उद्धव ठाकरेंबरोबर राहणार : आमदार शंकरराव गडाख
Published on
Updated on

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाकडून दुसर्‍या गटाला दिले आहे. चिन्ह दुसर्‍या गटाला मिळणं हा अनाकलनीय व दुर्दैवी निर्णय असा असून मी कायम उद्धव ठाकरेंबरोबरच राहणार आहे. ते जशी वाटचाल करतील त्याप्रमाणे मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची स्पष्ट भूमिका माजी जलसंधारण मंत्री व नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी घेतली आहे.

धनुष्यबाण चिन्हा बाबत निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका याबाबत माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आ. गडाख म्हणाले, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाकडून काढून दुसर्‍या गटाला दिले त्यामुळे शिवसेना व कार्यकर्ते खचून जातील अशी कोणतीच परिस्थिती नाही, उलट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गावागावात व घराघरात नेण्यासाठी शिवसैनिक पेटून उठतील. रक्ताचं पाणी करून काम करतील. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. ते जशी वाटचाल करतील त्यांच्याबरोबर भक्कमपणे पाठिशी उभा राहून त्यांना साथ देण्याचे काम करणार असल्याची स्पष्ट भूमिका आ. शंकरराव गडाख यांनी स्पष्ट केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news