

नगर; पुढारी वृत्तसेवा : बुरुडगाव (ता. नगर) येथील प्रताप लक्ष्मण पाचारणे यांच्या घराला अचानकपणे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आमदार संग्राम जगताप यांनी तत्काळ पाहणी करून पाचरणे कुटुंबियाला आर्थिक मदत केली.
बुरुडगाव येथील प्रताप पाचारणे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात संसार उपायोगी साहित्य जळून खाक झाले. पाचरणे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी घनास्थळी जावून पाहणी केली. पाचरणे कुटुंबियाची विचारपूस करून आर्थिक मदतही दिली.
यावेळी विशाल पवार, माजी सरपंच बापूसाहेब कुलट, सुरेश बनसोडे, उपसरपंच महेश निमसे, खंडू काळे, रवींद्र ढमढेरे, अमित जाधव, दिनेश शेळके, उमेश कुलट, संकेत कुलट, मोहन काळे, बाळासाहेब साबळे, सचिन फुलारे, जालिंदर कुलट, फारुख शेख, सोहेल सय्यद, नितीन जाधव आदी उपस्थित होते.