शेवगावच्या पूर्व भागात गारपीट; अवकाळी पावसाने ज्वारी, बाजरी भुईसपाट

शेवगावच्या पूर्व भागात गारपीट; अवकाळी पावसाने ज्वारी, बाजरी भुईसपाट
Published on
Updated on

बोधेगाव; पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गोळेगाव, शेकटे, लाड जळगावच्या शिवारात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजता गारपीट झाली. त्यामुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ही गारपीट वीस मिनिटे होऊन हरभर्‍याच्या आकाराएवढ्या गारा पडल्याचे गोळेगाव येथील शेतकरी संपत फुंदे, ढाकणे वस्तीचे अंबादास ढाकणे, शेकटे येथील भगवान केशर या शेतकर्‍यांनी सांगितले.

बोधेगाव, बालम टाकळी, गायकवाड जळगाव येथे याच दरम्यान अर्धा तास जोरदार पाऊस झाला. हातगाव व कांबी येथे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा शिडकाव झाला. अवकाळी पाऊस व गारपिटीने काढणीस आलेला गहू, शेतात कापून ठेवलेला गहू पूर्ण भिजला आहे. हरभरा, उन्हाळी बाजरी, कांदा या पिकांंचे नुकसान झाले आहे. शेकटे, गोळेगाव शिवारात काढणीस आलेले ज्वारीचे पीक भुईसपाट झाले. त्यामुळे शतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news