गुजरातचा ऐतिहासिक विजय गरीब कल्याणाचा : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

गुजरातचा ऐतिहासिक विजय गरीब कल्याणाचा : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला ऐतिहासिक विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या योजनांचे आणि विकास प्रक्रियेचे यश असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर गुजरातच्या जनतेन विश्वास ठेवून या, ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.

ज्या गुजरात राज्यातून मोदीजींनी विकासाचे मॉडेल जनतेसमोर आणले. त्याच ध्येयाने संपूर्ण देशात विकासाची प्रक्रिया वेगाने सुरू असून केंद्र सरकारच्या माध्यमातून गरीब कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू त्यामुळेच जनतेचा विश्वास सरकारच्या कार्यप्रणालीवर असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले असल्याचे विखे पाटील म्हणाले. आज जगात विकासात्मक देश म्हणून भारताची प्रतिमा उंचावत असल्याने जी-20 परीषदेचे मोदीजींकडे आलेले अध्यक्षपद हे या विकास प्रक्रियेचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.

'सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास' या मंत्राने संपूर्ण देशात आज विकासाची प्रक्रिया सुरू असल्याने सामान्य माणसाचा जनाधार भाजपच्या पाठीशी असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले असल्याचे सांगतानाच गुजरातच्या जनतेन 55 टक्क्यांच्या पुढे भाजपाला दिलेले ऐतिहासिक मतदान हे सरकार आणि पक्षावर दाखवलेल्या विश्वासच प्रतिक असल्याचे विखे पाटील म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'भारत जोडो' यात्रेचा कोणाताही परिणाम या निवडणुकीवर झाला नसल्याकडे माध्यमांचे लक्ष वेधून विखे यांनी सांगितले की, एकहाती सत्ता मिळविणार्‍या या पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news