नगरमधील तिसगावात रंगला आहे ग्रामसेवक-सत्ताधारी सामना !

नगरमधील तिसगावात रंगला आहे ग्रामसेवक-सत्ताधारी सामना !

करंजी : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुक्यातील तिसगाव मोठी व्यापारी बाजारपेठेचे गाव आहे. या ग्रामपंचायतमध्ये 40 वर्षानंतर सत्तांतर झाले असून, नवीन चेहर्‍यांना ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्याची संधी मिळाली आहे. ग्रामसेवक काही दिवसापूर्वी करंजीवरून बदलून आले आहेत; परंतु सत्ताधारी गटाने ग्रामसेवकावर अविश्वास व्यक्त करत, त्यांची तत्काळ इतरत्र बदली करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे पाथर्डी पंचायत समितीकडे केली आहे. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे तिसगावच्या सरपंच, उपसरपंचासह नऊ सदस्यांनी ग्रामसेवकाच्या कारभारावर नाराजगी व्यक्त करत त्यांच्या बदलीची मागणी केली.

तिसगावला बदली होऊन आलेले ग्रामसेवक अगोदर करंजी येथे कार्यरत होते. करंजीतही काही ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसून ग्रामसेवकाची इतरत्र बदली करण्याची मागणी केली होती. यानंतर त्यांच्याकडे तिसगावचा चार्ज देण्यात आला. तिसगावमध्ये नवीन गडी नवा डाव अशा पद्धतीने निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा उत्साह पाहता ग्रामसेवक; मात्र त्यांना चुकीचे उत्तर देतात. सतत कार्यालयात गैरहजर असतात, सरपंच, उपसरपंच, सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत, लोकांना दाखले-उत्यांरांसाठी ग्रामपंचायतमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागतात. असा आरोप लेखी निवेदनाद्वारे सत्ताधारी गटाने ग्रामसेवकाविरोधात करत अविश्वास व्यक्त केला. आता, पंचायत समिती प्रशासन नेमकी काय कारवाई करणार हे पहाणे औचित्याचे ठरणार आहे.

ग्रामसेवकाच्या विरोधात दिलेल्या निवेदनावर सरपंच मुनिफा शेख, उपसरपंच संगीता गारुडकर, सदस्य फरहद शेख, मुमताज शेख, बिस्मिल्ला पठाण, पंकज मगर, काशिनाथ ससाने, रजिया शेख, सिकंदर पठाण, कल्पना नरवडे, सुरेखा लवांडे या सदस्यांच्या सह्या आहेत. संपूर्ण सत्ताधारी गटच ग्रामसेवकाच्या विरोधात उतरल्याने सध्या तिसगावमध्ये सत्ताधारी विरोधी ग्रामसेवक असा सामना रंगल्याचे पहायला मिळत आहे.

ग्रामसेवकाचे व आमचे वैयक्तिक कुठे वाद नाहीत; परंतु आमच्याकडून तिसगावकरांना फार मोठ्या अपेक्षा आहेत. तिसगावकरांना विकास हवा, आम्हाला विश्वासात न घेता, सतत गैरहजर राहणे, चुकीचे उत्तर दिले जाते. तीन वेळा निवेदन देऊनही बदली होत नाही, याचा अर्थ वरिष्ठ अधिकारीही त्यांना पाठीशी घालण्याचे काम करतात. लवकरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकार्‍यांना निवेदन देणार.
                                     -पंकज मगर, ग्रामपंचायत सदस्य, तिसगाव

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news