सावेडी : लग्नसराईत सोन्याला चकाकी..! सराफ बाजार फुुुलला

File Photo
File Photo

सावेडी : पुढारी वृत्तसेवा : लग्नसराईला जोमात प्रारंभ झाला असून, सराझा बाजारात चैतन्याचे वातावरण असून, पेढ्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. पुढील सहा महिन्यात तब्बल 42 लग्न तिथी असून, यामुळे सोन्याला चकाकी येणार आहे. चांदीलाही चांगली मागणी वाढली आहे. लग्नसमारंभासाठी वधू-वर पक्षांकडून पारंपारिक सोन्याच्या दागिन्यांची मागणी असते. मात्र, सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याने ग्राहकांना आता सोन्याचे दागिन्यांसाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार. मंगळवारी (दि.6) सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळा 53 हजार (जीएसटीसह), तर चांदी 65 हजार रुपये प्रति किलो दर होता.

दिवाळीनंतर (तुळशी लग्न) सुरू होणार्‍या लग्नसराईत सराफ व्यवसायात सोन्याचे दागिने खरेदी करता ग्राहकांची गर्दी होत असून, लग्नसमारंभासाठीचे पारंपरिक दागिन्यांना नेहमीच मोठी मागणी असते. त्यामुळे सराफ बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होते. सध्या वधू-वरांकडून हलक्या वजणाची सोने आणि चांदीचे विविध दागिन्यांना पसंती मिळत असल्याने, स्थनिक सुवर्णकारांना सोन्या-चांदीचे दागिने घडवण्याचे काम मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सुवर्णकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, लग्नसराईत सोन्याचे दर दिवाळी दरम्यान 51 हजार रुपये होते. मात्र, एक महिन्यात सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे अडीच हजारांनी वाढल्याने ग्राहकांना आता लग्नाचे दागिने खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

लग्नात नवरीला सोन्याचे गंठण, नेकलेस, डोरले, मनी- मंगळसूत्र, झुबे, बांगड्या आदी अलंकाराने सजवले जाते. त्यामुळे सर्व व्यवसायकांकडून सुवर्णकरांच्या हाताला काम मिळाल्याने सुवर्णकरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पुढील सहा महिन्यातील विवाहाचे मुहूर्त
डिसेंबर (2022) : 8, 9, 14, 16, 17, 18, जानेवारी : 18, 26, 27, 31,
फेब्रुवारी : 6, 5, 7, 10, 11, 14, 16,22, 23, 24, 27, 28,
मार्च : 8, 9, 13, 17, 18, मे : 2, 3, 4, 7, 9, 10, 11, 12, 15, 16, 21, 22, 29, 30,

पुढील लग्न सराईत सोन्याच्या दागिन्यांतचे दर वाढण्याची शक्यता असल्याने सोन्याचे दागिने खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी मजुरीवर डिस्काउंट, तसेच सोन्याच्या वजना इतकी चांदी मोफत देण्यात येणार आहे.
– अमित कोठारी, संचालक चंदुकाका ज्वेलर्स, नगर

चार दिवसात सोन्याच्या भावात प्रति तोळा तीन हजारांची वाढ झाली. याचा आर्थिक फटका वधू-वर पक्षांवर पडू नये, यासाठी वधू- वर पक्ष सराफ बाजारात खरेदीसाठी येत आहेत. पुढील काळात लग्नाचे दागिने खरेदीसाठी जास्त पैसे लागण्याची शक्यता आहे.
-प्रकाश हिंगणगावकर, संचालक हिंगणगावकर सराफ, नगर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news