

वाळकी (ता . नगर); पुढारी वृत्तसेवा : हिवाळा घोणस जातीच्या अतिविषारी सापांचा 'मिटिंग' ( मिलन) चा सिझन असतो. त्यामुळे ते अनेकदा आपल्या दृष्टीस पडत आहेत. खडकी येथे असेच दोन घोणस जातीचे नरमादी साप विहिरात पडल्याचे कळल्यानंतर सर्पमित्र शितल कासार हिने अतिशय धाडसाने विहिरीत उतरून या विषारी सापांना बाहेर काढत जीवदान दिले. खडकी येथील स्वप्निल कोठुळे यांच्या शेतातील विहिरीत दोन सापल्याचे त्यांच्या निदर्शनात आले.
अजगर समजून त्यांनी या सापांना कोणतीही बाधा न करता महिला सर्पमित्र शितल कासार यांना माहिती दिली . शितल हिने तातडीने या ठिकाणी येत स्वसंरक्षणाचे साधन वापरत विहिरीत उतरून या दोन सापांना उलगद बाहेर काढत जीवदान दिले. वाळकीतही तीने विषारी सापांना उतरण्यास खडतर असणार्या विहिरीतून बाहेर काढले आहे. शितल कासार म्हणाली, अजगर आपल्या भागात भारच क्वचित आढळतो. मात्र, अजगरासारखा भासणारा घोणस जातीचा अतिविषारी साप आपणाकडे निदर्शनास पडतो.
सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने या विषारी घोणस सापांच्या मिलनाचा या सिझन असतो. त्यामुळे या दिवसात घोणस साप जोडीने आपल्या निदर्शनात पडतात. लोकांना घोणस सापांची माहिती नसल्याने त्यांना अजगर असल्याचा भासतो. या सापाचे जाडसर शरीर असून, पिवळसर, तपकिरी रंगाचा असतो. शरीराच्या मानेपासून काळपट तपकिरी रंगाची मोठ्या आकाराची टिपक्यांची रांग असते.
याची लांबी पाच ते साडेपाच फुटांपर्यंत असून, याचे वास्तव्य जुन्या पडक्या घरात, विटा, माती व लाकडाच्या ढिगार्याखाली आढळते. या सापाचे खाद्य उंदिर, घूस आहे. हा घोणस साप अतिविषारी असल्याने लोकांना यापासून दूर राहणे गरजेचे आहे. महिला असूनही ती विषारी साप मोठ्या धाडसाने पकडते. उतरण्यास अवघड असलेल्या विहिरीतून तीने दोराच्या साह्याने उतरत तिने वाळकी परिसरातील अनेक विषारी सापांना बाहेर काढत जीवदान दिले आहे . तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घोणस हा अतिविषारी जातीचा साप आहे. तो स्वतःहून कुणालाही दंश करीत नाही. हा अतिशय आक्रमक आहे. त्याला डिवचल्यास हा साप आक्रमक होऊन कुक्करच्या शिट्टीसारखा आवाज काढतो. या सापाचे तोंड भाल्याच्या टोकासारखे असते. या सापांपासून लोकांनी दूर राहणे गरजेचे आहे. कोणताही साप दिसल्यास त्यास मारू नये.
– शीतल कासार, सर्प मैत्रिण