अकोले, पुढीरी वृत्तसेवा : म्हाळादेवी येथे प्रवरा नदी पाञात कपडे धुण्यासाठी गेलेल्या पुनम किरण भोसले (वय २७ रा. कोल्हार खुर्द) व आर्या किरण भोसले (वय ३) मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. परंतु आईचा मृतदेह ३ तासानंतर चिमुकलया आर्याचा मृतदेह सुमारे १४ तासाने सापडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हार खुर्द सासरी असलेल्या पुनम भोसले व आर्या या मायलेकी म्हाळादेवी या गावी माहेरी आल्या होत्या. गुरुवारी दुपारी पुनम व त्यांची मुलगी आर्या कपडे धुण्यासाठी स्मशानभूमी लगत असलेल्या धोबी घाटावर गेल्या होत्या. वडील नारायण हे अकोले येथे आठवडे बाजारात गेले होते. ते दुपारी चार वाजता घरी आल्यानंतर लेक व नात घरी नसल्याने त्यांनी शोधाशोध केली. धोबी घाटावर या मायलेकींच्या चपला व धुण्यासाठी आणलेले कपडे दिसले.
गावकऱ्यांना शोधले असता पाण्यातून पुनम यांचा मृतदेह रात्री बाहेर काढण्यात आला. आर्याच्या पोलीस व नागरिकांनी पाण्यात रात्रभर शोध घेतला. अखेर सकाळी प्रवरा नदीच्या पात्रात आर्यांचा मृतदेह तब्बल १४ तासाने आढळून आला. अकोले पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
.हेही वाचा