नगर : घरकुलांची रक्कम परत जाण्याच्या मार्गावर

नगर : घरकुलांची रक्कम परत जाण्याच्या मार्गावर
Published on
Updated on

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 6 हजार 713 घरकुल मंजूर झाले होते. त्यापैकी 4 हजार 841 घरकुलांची कामे पूर्णत्वाकडे असून उर्वरित 1 हजार 872 घरकुलांची कामे अपुर्ण आहेत. तर 178 लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे अद्यापही सुरु केले नसल्याने घरकुले रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकोले तालुक्यात पंचायत समितीतंर्गत सन 2015 – 2023 मध्ये पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 6 हजार 713 घरकुले मंजूर झाले होते. त्यापैकी 4 हजार 841 घरकुलांची कामे पूर्णत्वाकडे असून उर्वरित 1 हजार 872 घरकुलांची कामे अपुर्ण आहेत. तसेचं 'रमाई' आवास योजना व 'शबरी' आवास योजना अंतर्गत 2 हजार 206 पैकी 1 हजार 898 पुर्ण झाले आहे. तर 308 घरकुले अपुर्ण अवस्थेत आहेत.

तालुक्यातील आदिवासी भागासह राजूर, कोतूळ, ब्राह्मणवाडा, अकोले, समशेरपूर, खिरविरे परिसरात घरकुल यादीत नावे आली. मात्र, नावावर जागाच नसल्यामुळे घरकूल बांधणार कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुर्वी घरकुल मंजूर झाले आणि लाभार्थ्यांकडे जागा नसेल तर ग्रामपंचायतच्या वतीने गावठाणच्या जागेसाठी तरतूद करण्यात येत असे. आता मात्र ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध होणार नसून, घरकुल यादीत नाव आलेल्यांना स्वतः जागेची व्यवस्था करावी लागणार आहे.

ग्रामपंचायत, पंचायत समिती जागेच्या कागदपत्रांसह प्रस्ताव कार्यालयात सादर केल्यानंतर घरकुल अनुदानाचा पहिला हप्ता तत्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. परंतु, तालुक्यातील बहुतांशी लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या यादीत नाव येऊनही प्रस्ताव सादर केला नसल्यामुळे कामे रखडली आहेत. या घरकुलांची कामे सुरू करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून प्रयत्न होत असले तरी लाभार्थ्यांकडून मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आदिवासी भागात दिसत आहे.

घरकुले पूर्ण करून घेण्यासाठी पालक अधिकारी नेमण्यात आले असुन घरकुले पूर्ण व्हावे म्हणून पालक समिती प्रबोधन करीत आहे. तर अकोले पंचायत समितीकडून घरकुल संदर्भात जागेसह प्रस्ताव सादर करण्यासंबंधी ग्रामपंचायतीला सूचना करण्यात आल्या असून संबंधित लाभार्थ्यांनाही कळविण्यात आले आहे. परंतु, त्या उपरही जागेसंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा ग्रामस्थांचे घरकुल रद्द होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. अकोले तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनी वेळेत घरकुले सुरू करावीत. अन्यथा लाभार्थ्यांच्या खात्यावर अदा केलेली रक्कम वसूल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

अकोले तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे वेळेत सुरू न केल्याने शासकीय निधी परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये लाभार्थ्यांनी सतर्क राहून घरकुले कामे सुरू करावे. 178 घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल काम वेळेत सुरु केले नसल्याने अदा केलेली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावरुन शासनाच्या खात्यावर परत घेण्यासाठी पंचायत समितीच्या स्तरावरुन संबंधित बँकेला कळविण्यात आले आहे.
               – राहुल शेळके, गटविकास अधिकारी, अकोले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news