

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीच्या निवडणुका अटीतटीच्या लढतीत झाल्या. या निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व राहिले आहे. सोमवारी तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी होऊन दुपारी सर्व निकाल जाहीर झाले. जसजसे निकाल जाहीर होत होते, तसतसे विजयी उमेदवारांचे समर्थक गुलालाची उधळण करून जल्लोष करीत होते.
गावनिहाय विजयी उमेदवार –
देडगाव – सरपंच – चंद्रकांत भानुदास मुंगसे. सदस्य – पोपट विठ्ठल मुंगसे, अलका कानिफनाथ गोयकर, मिनाक्षी लक्ष्मण मुंगसे, अंबादास काशीनाथ तांबे, बाळासाहेब ज्ञानदेव मुंगसे, सुषमा आनंद दळवी, जालिंदर एकनाथ खांडे, राधिका अनिकेत मुथा, मार्था विश्वास हिवाळे, अविनाश भाऊसाहेब कदम, उषा संजय गायकवाड, रत्नमाला लालबहादूर कोकरे, अभिजित भाऊसाहेब ससाणे, अर्जुन लक्ष्मण कोकरे, केशर महादेव पुंड.
करजगाव – सरपंच – अनिता भिमराज गायकवाड. सदस्य – अशोक साहेबराव टेमक, कावेरी भास्कर माकोणे, ताई संतोष मदने, सतीश सूर्यभान फुलसौंदर, अरूणाबाई भाऊसाहेब माकोणे, बेबी विजय निकम, सविता संतोष जाधव, गोरख काशीनाथ बाचकर, संकेत भीमराज गायकवाड, रोहिणी संजय शिंदे, राहुल कैलास देवखिळे.
जैनपूर – सरपंच – शैला किशोर शिरसाठ. सदस्य – कानिफनाथ अशोक डिके, संध्या किरण डिके, हिराबाई बाळासाहेब डिके, शिवाजी निवृत्ती गिते, ताराबाई कडू गव्हाणे, सविता संदीप सुरूसे, अर्जुन नारायण शिरसाठ, संदीप दादा डिके, सविता भारत बर्डे.
कौठा – सरपंच – प्रमोद त्रिंबक गजभार. सदस्य – कडुबाळ नामदेव मोहिते, सुजाता गोरक्षनाथ काळे, कलाबाई कारभारी म्हस्के, शिवाजी रामभाऊ ढेरे, कविता पांडुरंग चक्रनारायण, सविता राजेश वाघ, दीपक सुदाम वाघ, अरूण जनार्दन भासार, सुवर्णा नानासाहेब काळे.
खुणेगाव – सरपंच – नामदेव माधवराव गायकवाड. सदस्य – सविता संभाजी कदम, वत्सला चांगदेव कर्डिले, ज्ञानेश्वर लक्ष्मण पवार, नंदाबाई अशोक गायकवाड, धोंडीराम गोरक्षनाथ पवार, माधुरी संजय गायकवाड, इसाक चिरागअली सय्यद.
नागापूर – सरपंच – सुजाता संदीप कापसे. सदस्य – दीपक कचरू चक्रनारायण, मंगल तात्यासाहेब कापसे, आशाबाई बन्सी कापसे, अविनाश रावसाहेब लवांडे, अंजना संजय आढागळे, तुषार सुभाष काळे, नंदाबाई ज्ञानेश्वर जावळे.
पिचडगाव – सरपंच – उषा पोपट हजारे. सदस्य – श्रीकांत दादा बनसोडे, सुमन सोन्याबापू डिवरे, सविता दत्तात्रय हजारे, जगदीश बबनराव शेजूळ, संदीप अशोक गव्हाणे, विजूताई भाऊसाहेब शेजूळ, भीमाबाई बाबुराव बनसोडे.
फत्तेपूर- सरपंच – निलोफर इस्माईल शेख. सदस्य – सोनाली मुकिंदा बोरूडे, मयुरी बाळासाहेब खुणे, प्राची योगेश धुमाळ, बबन बाबुराव गायकवाड, हरिभाऊ मुरलीधर माळी, अंजली दिगंबर फरताळे, अनिता दत्तात्रय गवते.
पाचेगाव- सरपंच – वामन जालिंदर तुवर. सदस्य – रामभाऊ विठ्ठल जाधव, सारिका शांताराम तुवर, राजाबाई कचेश्वर कहार, ज्ञानदेव द्वारकानाथ आढाव, अनिता बापू माळी, भारती बाळासाहेब मतकर, धोंडीराम मनाजी राक्षे, अशोक फकिरा सुरसे, जयश्री गणेश बर्डे, मुमताज रमजान शेख, प्रताप बद्रीनाथ नांदे, संदीप बन्सी नांदे, मंदाबाई सोनाजी देठे.
सौंदाळा – सरपंच – शरद बाबुराव आरगडे. सदस्य – भीवसेन सारंगधर गरड, इंदूबाई ज्ञानदेव आरगडे, छाया मिनीनाथ आरगडे, भीमराज सजन अढागळे, लक्ष्मण चंद्रकांत चामुटे, सुरेखा सुधीर आरगडे, गणेश अरूण आरगडे, कोमल पंकज आरगडे, जिजाबाई नामदेव बोधक.
मुकिंदपूर – सरपंच – कल्पना सतीश निपुंगे. सदस्य – कानिफनाथ गोरख कराडे, मैजला प्रसाद खंडागळे, सुनिता संजय निपुंगे, प्रताप प्रकाश हांडे, वर्षा बाळासाहेब केदारे, भारती अशोक करडक, विनायक नारायण शिरसाठ, दीपक चंद्रकांत डमाळे, विजय दत्तात्रय कांबळे, नंदा अरूण निपुंगे, अमोल चंद्रभान घुले, मंदाबाई प्रकाश इंगळे, सुनिता भीमराज उपळकर.
पानेगाव – सरपंच – निकीता मच्छिंद्र भोसले. सदस्य – कुसूम साहेबराव शेंडगे, शांताबाई नारायण जंगले, सुरेश प्रल्हाद जंगले, दीपाली ज्ञानेश्वर जंगले, रमेश सुभाष जंगले, हनुमंत त्रिंबक घोलप, रंजना दिगंबर जाधव, चंद्रकला नामदेव गुडधे, मीना नारायण जंगले.
भानसहिवरा – येथे 15 सदस्य बिनविरोध झाले होते. फक्त सरपंच पदासाठी निवडणूक होऊन मिना किशोर जोजार व निलोफर कय्युम देशमुख यांच्यात लढत झाली. यामध्ये मिना जोजार यांना 2768 मते मिळून त्या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. देशमुख यांना 1364 मते मिळाली आहेत.
माळीचिंचोरा – ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये पोटनिवडणूक होऊन याठिकाणी योगिता अंबादास नजन या निवडून आलेल्या आहेत.
शहापूर – सरपंच – मनिषा संदिप कोलते. सदस्य – संजय सीताराम कोलते, शुभांगी संभाजी देवकर, अनिता अशोक शिंदे, अनिल माणिक कोलते, सुरेखा दत्तात्रय कोलते, सुनील शिवाजी कोलते, शीतल किरण आरगडे.
रस्तापूर – सरपंच – हिराबाई मारूती कोकाटे. सदस्य – अमोल विठ्ठल वैरागर, शशिकला भारत भाकड, मनिषा अमोल गाढवे, संदीप रघुनाथ उर्किडे, सीमा नितीन भाकड, अण्णासाहेब झुंबड अंबाडे, बेबीताई रामभाऊ कुटे, सुनिता सुरेश डाके, बापूसाहेब रावसाहेब अंबाडे, मीरा हरिभाऊ मचे, भाऊसाहेब कुंडलिक माळी.
पानसवाडी – ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व एका सदस्य जागेसाठी निवडणूक झाली. यामध्ये किसनराव पेशवे, गडाख गटाचे विकास आण्णासाहेब वैरागर हे निवडून आले. तर, प्रभाग 1 मधून संतोष धोंडीराम सोनवणे हे विजयी झाले आहेत.