नगर : महापालिकेकडून चार मालमत्ता सील

नगर : महापालिकेकडून चार मालमत्ता सील

नगर; पुढारी वृत्तसेवा : थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी महापालिकेने ठोस कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी प्रभाग समिती दोनमध्ये चार मालमत्ता सील करण्यात आल्या. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या करवसुली पथकाने थकबाकीदारांवर ठोस कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी थकीत मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन तोडले. सोमवारी (दि. 20) प्रभाग समिती दोनमधील वार्ड नऊमध्ये मे. आयडिया सेल्युलर लिमिटेड कंपनीचे जयंत नारायण देशमुख (रा. कोर्टगल्ली, शारदा सेंटर) यांच्या मिळकतीवर एक लाख 26 हजार 621 थकबाकीपोटी 26 हजार 700 रुपये 10 नोव्हेंबर 2022 रोजी भरले होते.

उर्वरित थकबाकीपोटी जप्तीची कारवाई करून मालमत्ता सील करण्यात आली. वार्ड सोळामध्ये असेंड टेलिकॉम इन्फ्रा. प्रा. लि. कंपनीचे रमाकांत श्रीकृष्ण निघोजकर (रा. विळदकर गल्ली, माळीवाडा) यांची मिळकत एक लाख 71 हजार 85 रुपयांच्या थकबाकीपोटी सील करण्यात आली.

वार्ड 17 मध्ये शेख नसीर हुसेन व इतर भोग-विओम इन्फ्रा. महाराष्ट्र लि. ही मिळकत 21 लाख 46 हजार 75 रुपयांच्या थकबाकीपोटी सील करण्यात आली. वार्ड नऊमध्ये के. पी. बोथरा (रा. कोर्ट रोड, गुजर गल्ली) ही मिळकत तीन लाख 35 हजार 364 थकबाकीपोटी सील करण्यात आली. कर निरीक्षक श्याम गोडळकर, ए. सी. शेख, पंकज इंगळे, एस. एस. साबळे, बी. जी. आमले, ए. एन. गोयर, रवींद्र साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

logo
Pudhari News
pudhari.news