कान्हूरपठार : ग्रामसडक योजनेतून पुणेवाडीसाठी साडेपाच कोटी निधी

कान्हूरपठार : ग्रामसडक योजनेतून पुणेवाडीसाठी साडेपाच कोटी निधी

कान्हूरपठार(ता.पारनेर); पुढारी वृत्तसेवा : पुणेवाडी येथील पुणेवाडी फाटा ते पुणेवाडी रस्त्याला पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दोन कोटी 98 लक्ष रुपये, पुणेवाडी येथील 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्रासाठी दोन कोटी 59 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे यांनी दिली.
शेतीची वीज आणि पुणेवाडी फाटा ते पुणेवाडी रस्ता ही दोन मोठी आणि लोकांच्या जिव्हाळ्याची कामे मार्गी लावल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी पालकमंत्री विखे यांचे आभार मानले. पूर्वी पारनेर उपकेंद्रातून पुणेवाडीला वीज पुरवठा होत होता.

परंतु, वीज पुरावठा करणार्‍या फिडरवर पुणेवाडी, हत्तल खिंडी, सोबलेवाडी, कुंभारवाडी गावांचा समावेश होत होता. त्यामुळे फिडरला आधीच प्रचंड भार होता. चार वर्षांपासून विद्युत उपकेंद्राच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. खासदार डॉ. सुजय विखे यांनी या प्रश्नी लक्ष घालून पुणेवाडीसह इतर गावांना उपकेंद्राच्या माध्यमातून न्याय दिला. लवकरच उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात येईल. पूर्वी तिखोल फाट्यापासून सुरू होणार्‍या पंतप्रधान ग्रामसडक योजनेमध्ये पुणेवाडी येथील रस्ता समाविष्ट होता. संपूर्ण रस्ता हा त्यावेळेस पूर्ण होऊ शकला नाही.

ग्रामस्थांसोबत सातत्याने पाठपुरावा केला. शिंदे- फडणवीस सरकारने बंद असलेली मुख्यमंत्री ग्रामसडक योजना पुन्हा नव्याने सुरू केली. पुन्हा पुणेवाडीचा उर्वरित राहिलेला रस्ता या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. या रस्त्याला दोन कोटी 98 लक्ष रुपयाची प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती माजी सरपंच रेपाळे यांनी दिली. या रस्त्यामुळे पुणेवाडीच्या रस्त्याचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. यासाठी सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे, तालुकाध्यक्ष वसंत चेडे आदींचे सहकार्य लाभले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news