नगर : सत्यजित यांचे मौन, डॉक्टर म्हणाले थोरातच नेते

नगर : सत्यजित यांचे मौन, डॉक्टर म्हणाले थोरातच नेते

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  नाशिक पदवीधर मतदारसंघात बंडखोरी करणारे सत्यजित तांबे यांनी बंडखोरीबाबत भाष्य करण्यास नकार दिला, मात्र दोन-चार दिवसात भूमिका स्पष्ट करू असे त्यांनी सांगितले. बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांचे वडील आ. सुधीर तांबे यांनी पक्षपातळीवर चर्चा केल्यानंतर भूमिका स्पष्ट करू असे सांगतानाच माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात हेच नेते असून त्यांना कदापी सोडणार नसल्याचे जाहीर केले.  अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सत्यजित तांबे संगमनेरात पोहचले आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींनी निवासस्थानी घेत त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र आताच कुठलेही भाष्य करणार नाही. वेळ आल्यानंतर दोन-चार दिवसांनी नक्कीच भूमिका स्पष्ट करेल असे त्रोटक उत्तर त्यांनी दिले. काँग्रेस विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात हेच आमचे नेते, कुटुंब प्रमुख आणि नातेवाईक आहेत. त्यामुळे त्यांना सोडणे कदापीही शक्य नाही. पातळीवर चर्चा करून भूमिका स्पष्ट करू असे आ. डॉ सुधीर तांबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातून काँग्रेसने आ.डॉ सुधीर तांबे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली असताना त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.

शेवटच्या क्षणी सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली. सत्यजित यांच्या बंडखोरीने काँग्रेस तोंडघशी पडल्याने राज्यात चर्चेचा विषय झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला पक्ष पाठिंबा देणार नाही, असे जाहीर केले. पटोले यांच्या विधानाकडे सत्यजित तांबे यांचे लक्ष वेधले असता 'योग्य वेळ आल्यानंतर नक्की बोलेल, रियाक्शन व प्रतिरियाक्शन नको, आता कुठल्याही प्रकारचा भाष्य करू शकत नाही. दोन-चार दिवसानंतर माध्यमातून माझी भूमिका स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news