आश्वी : शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळणार : महसूलमंत्री विखे

आश्वी : शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळणार : महसूलमंत्री विखे
Published on
Updated on

आश्वी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती पीकांची भरपाई देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. तालुक्यातील 54 हजार 269 शेतकर्‍यांना 45 कोटी 57 लाख रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिली. आश्वी येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते.

ते म्हणाले, जुन 2022 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि शेती पिकांच्या नुकसानीनंतर मदत मिळावी, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा होती. नुकसानीचे पंचनामे सादर करण्यात आले होते. मदतीच्या आलेल्या प्रस्तावाचा विचार करुन राज्य सरकारने अतिवृष्टीचा निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीकरीता विशेष बाब म्हणून तालुक्यातील 163 गावांतील शेतकर्‍यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे, असे ते म्हणाले.

यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर, भगवानराव इलग, गोकूळ दिघे, सचिन शिंदे, अशोकराव जर्‍हाड, तबाजी मुन्तोडे, निवृत्ती सांगळे, शिवाजीराव कोल्हे, जेहूरभाई शेख, अशोक खेमनर, सुनिल मुन्तोडे, सतिष जोशी, भारतराव गीते, रमेश गीते, श्रीकांत गोमसे, शिवाजी इलग, राजेंद्र जाधव, अशोक खेमनर, मोहीत गायकवाड आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गारपिटीतील नुकसानीचा निधीही जमा होणार
संगमनेर तालुक्यातील 54 हजार 269 शेतकर्‍यांना 45 कोटी 57 लाख रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग सरकारच्या निर्णयामुळे मोकळा झाला. शेतकर्‍यांच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा होणार आहे. यापूर्वीही तालुक्यात गारपीटीमुळे नुकसान झालेल्या 155 शेतकर्‍यांना 1 कोटी 60 लाख रुपयांची मदत सरकारने घोषित केली आहे. हा निधीही शेतकर्‍यांच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने जमा होणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी यावेळी बोलताना सागितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news