संगमनेर नगरपलिकेच्या पथकाने पालिकेने काल सकाळी 10 वाजता सहा जेसीबी, चार ट्रॅक्टर व सुमारे सव्वाशे कर्मचार्यांसह पोलिस फौजफाटा सोबत घेत मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी पालिकेच्या स्वमालकीचा असणारा भूखंड साफ करून त्यावरील कच्ची-पक्की अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू केली. त्यावेळी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी हजर राहून या मोहिमेत अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली.