वीजप्रश्नी आ. लहू कानडे आक्रमक ; श्रीरामपूर शहर, तालुक्यातील नागरिकांच्या बैठकीत केल्या सूचना

वीजप्रश्नी आ. लहू कानडे आक्रमक ; श्रीरामपूर शहर, तालुक्यातील नागरिकांच्या बैठकीत केल्या सूचना
Published on
Updated on

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  शेतकर्‍यांच्या वीजप्रश्नी पार पडलेल्या बैठकीत आ. लहू कानडे यांनी वीज अधिकार्‍यांना विविधप्रश्न धविचारीत चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, मतदारसंघात सेक्शननिहाय डी.पी. किती आहेत, ओव्हरलोड किती आहेत, अधिकृत कनेक्शन किती आहेत, अनाधिकृत कनेक्शन किती, नियमापेक्षा अधिक हॉर्स पॉवर्स मोटर्स किती आहेत, याची तपशीलवार माहिती संकलीत करुन आवश्यक अशा 100 डी.पी. नव्याने बसवून ओव्हरलोड डी.पी. वरील ग्राहकांना दिलासा द्यावा, अशा सूचना आ. लहू कानडे यांनी केल्या.

जनसंपर्क कार्यालय येथे आ. लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली मतदार संघातील वीजप्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मतदार संघातील शहरासह ग्रामीण भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डी. पी. जळणे, महावितरणच्या अधिकार्‍यांकडून सहकार्य न होणे, शेतकर्‍यांना स्वखर्चाने डी. पी. भरावी लागणे, वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, नवीन डी.पी. मिळणे, लाईन शिफ्ट करणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आ. लहू कानडे यांनी आवाहन केल्यानुसार ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी सादर केल्या.
वीजेच्या तक्रारी व प्रश्न लोकांसमक्ष अधिकार्‍यांसमोर मांडण्यात आले.

बैठकीसाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता भंगाळे, उपअभियंता डी. एन. चावडा, देवळाली प्रवराचे उपअभियंता पी. एच. देहरकर, बाभळेश्वर सबस्टेशनचे उपअभियंता व्ही.बी. सोनवणे, तसेच ममदापूर, बेलापूर, सुतगिरणी, श्रीरामपूर, बाभळेश्वर, देवळाली, हरेगाव, एमआयडीसी, कोल्हार सेक्शनचे शाखा अभियंता उपस्थित होते. आ. कानडे म्हणाले, सेक्शननिहाय मेंटेनन्सची कामांचा सर्वे करा. मेंटेनन्स ऑर्डर्स देऊन नियोजनपुर्वक कालबद्ध पद्धतीने कामे करुन घ्यावी, शेतकर्‍यांची कनेक्शन्स मागील थकबाकीसाठी तोडु नयेत, केवळ चालु बील भरुन घ्यावेत, जेथे मीटरची मागणी आहे व वीज मंडळ भरु शकलेले नाहीत, तेथे नवीन मीटर बसविण्यासाठी नवीन मीटर्स मागवावे, यासाठी पाठपुरावा करा, ग्राहकांना त्रास देऊ नका, अशा सुचना केल्या.

या बैठकीस तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, सतीश बोर्डे, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, बाबासाहेब कोळसे, रविंद्र आमले, राजेंद्र कोकणे, कार्लस साठे, अण्णासाहेब ढोणे, राधाकृष्ण तांबे, भैय्या शाह आदी उपस्थित होते. अन्वर बागवान, संजय भुजाडी, श्रीधर खंडागळे, तसवर बागवान, संजय रासकर, शाकीर बागवान, शोएब बागवान, सचिन येवले, अशोक पटारे राजेंद्र भांड, रविंद्र आमले, सुदाम भांड, आशिष शिंदे, संजय भोसले, राजेंद्र भोसले, सुनील गोरे, मल्हारी खिळे, गोविंद अण्णासाहेब आदिक, अमोल आदिक, शिवाजी आदिक, गणेश आदिक तक्रारींसह उपस्थित होते.

आपल्यामुळेच मी लोकप्रतिनिधी म्हणून विराजमान आहे. तुम्ही जनताच माझे कान, नाक, डोळे आहात. जनतेची कामे करणे माझे कर्तव्य आहे. अधिकार्‍यांनी कामात पारदर्शकता ठेऊन, शेतकर्‍यांना वीजप्रश्नी त्रास देऊ नये. वीजेअभावी पिकांचे नुकसान होणार नाही. घरगुती ग्राहकांना अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घ्या.

                                                                                   – आ. लहू कानडे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news