संगमनेर : पुढारी वृत्तसेवा कोकणगाव येथील शिवनंदन एंटरप्राइजेस या दुकानाला इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दुकानातील इलेक्ट्रिक सामानासह, पीव्हीसी पाईप, कॉम्प्युटर साहित्य, मुरघास बॅग व शेतीसाठी लाईट लागणारे साहित्य तसेच फर्निचर जळून खाक झाले असून अंदाजे एकूण 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही भयावह आग लागतात दुकानाचे मालक संदीप शिंदे यांनी तातडीने गावातील गावकर्यांची मदत मागीतली. गावचे उपसरपंच अरुण जोंधळे यांनी त्वरित सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व नगरपालिकेची अग्निशामक बोलून सदर आग विझविण्यासाठी मोठी मदत केली.
गावातील सर्व तरुणांनी या कामी अत्यंत पुढाकार घेत संदीप शिंदे यांना मोलाची मदत केली.घटनेची माहिती मिळतात तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी जोंधळे, भीमाशंकर जोंधळे, हनुमंत जोंधळे, दादासाहेब जोंधळे, रंगनाथ बिडवे, योगेश भोसले, अशोक मारुती वायकर, सोमनाथ जोंधळे, संकेत जोंधळे, महेश जोंधळे, चंदू वायकर ग्रामसेवक बांगर, भीमाशंकर जोंधळे आदींसह विविध तरुण व ग्रामस्थांनी मदत केली.