नगर शहर बँकेची 29 जानेवारीला निवडणूक; 30 डिसेंबरपर्यंत स्वीकारणार उमेदवारी अर्ज

नगर शहर बँकेची 29 जानेवारीला निवडणूक; 30 डिसेंबरपर्यंत स्वीकारणार उमेदवारी अर्ज
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार बँकेची निवडणूक 29 जानेवारी रोजीहोणार आहे. या निवडणुकीचा निकाल दुसर्‍या दिवशी 30 जानेवारीला जाहीर होणार आहे. 26 ते 30 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक यापूर्वीच जाहीर होऊन, प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर अचानक शासनाने निवडणूक प्रक्रिया थांबवत निवडणूक 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले होते. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांनी सोमवारी पुन्हा नगर शहर बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

बँकेच्या सर्वसाधारण मतदारसंघातून 10, अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघातून 1, महिला प्रत्तिनिधी 2, इतर मागासवर्गीय 1, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातून 1 अशा एकूण 15 संचालक पदांसाठी निवडणूक होत आहे. 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 2 जानेवारी रोजी उपलब्ध अर्जांची छानर्नीं होणार आहे.

वैध अर्जांची यादी 3 जानेवारीला प्रसिध्द होणार असून, 3 ते 17 जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज मागेघेता येणार आहेत. 18 जानेवारी रोजी चिन्हांचे वाटप होणार असून 29 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहें. 30 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news