Viral Video Eknath Shinde
संगमनेर : निवडणुकीच्या प्रचारात आदर्श आचारसंहितेच्या कडक नियमांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चक्क पळापळ करावी लागल्याचे चित्र अहिल्यानगरमधील संगमनेर येथे पाहायला मिळाले. गुरूवारी संगमनेर मधील प्रचार सभेमध्ये अवघे पाच मिनिट शिल्लक असताना शिंदे पोहोचले. आचारसंहितेची वेळमर्यादा पाळण्यासाठी त्यांची धावपळ झाली, यावेळी पोलीस प्रशासनाचीही मोठी दमछाक झाली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दररोज ५-६ जाहीर सभांना संबोधित करत आहेत. संगमनेर मधील प्रचार सभेला उशीर झाल्याने ते शिर्डी विमानतळावरून धावत होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिंदे, त्यांचे काही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत पळताना दिसतात. सभेमध्ये अगदी शेवटची पाच मिनिट शिल्लक असताना ते पोहोचले. या सभेला शिंदेची उशिरा हजरी लागली, तर ते शेगाव मधील सभेला मात्र गैरहजर राहिले.