कर्जत : जातीय सलोख्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक

कर्जत : जातीय सलोख्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : समाजातील जातीय सलोखा कायम राहण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी केले. नगर पोलिस दल व कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातर्फे शारदाबाई पवार सभागृहात सामाजिक एकता परिषदेचे आयोजन केले. यावेळी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, घनश्याम शेलार, अरूण जाधव, नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, प्रतिभा भैलुमे, मनीषा सोनमाळी, नीता कचरे, मीरा शिंदे, उपगटनेतेस प्राध्यापक सतीश पाटील, अमृत काळदाते, नागेश भोसले आदी उपस्थित होते.

बी.जी. शेखर पाटील म्हणाले, कर्जत उपविभागात मोठ्या प्रमाणात अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होतात. ही बाब अतिशय गंभीर आहे. एकमेकांमध्ये सलोख्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण होऊन अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील पोलिस ठाण्यामध्ये जास्तीत जास्त जातीय सलोखा निर्माण होण्यासाठी सर्व समाजातील घटकांना एकत्र आणून कार्यक्रम घ्यावेत.

प्रास्ताविकात उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी कर्जत उपविभागातील समावेश होणार्‍या कर्जत, मिरजगाव, जामखेड, खर्डा, श्रीगोंदा व बेलवंडी या पोलिस ठाण्यात मागील तीन वर्षांपासून अ‍ॅट्रॉसिटी संदर्भात जे गुन्हे दाखल झाले त्यांची माहिती दिली. यामध्ये नगर जिल्ह्याच्या तुलनेत तब्बल 35 टक्के प्रमाण कर्जत विभागात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी घनश्याम शेलार, अरूण जाधव, भाऊसाहेब रानमाळ, मीरा शिंदे यांच्यासह अनेकांनी जातीय सलोखा निर्माण होण्यासाठी व अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे कमी होण्यासाठी कोणती उपाययोजना करवी याची माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांनी आभार मानले.

सर्व प्रमुख व्यक्तींचे प्रबोधन : ओला
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, जातीय सलोखा चांगला राहावा, सर्वांनी एकत्र यावे आणि गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून नगर पोलिस दल व कर्जत उपविभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले. या माध्यमातून समाजातील सर्व प्रमुख व्यक्तींचे प्रबोधन करून त्यांच्याही समस्या जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news