पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण कुटुंबाचा प्रमुख कणा घरातील महिला आहेत. आपले संपूर्ण दुःख बाजूला ठेवून प्रपंचाचा गाढा ओढते, अशा एकाकी पडलेल्या नारीशक्तीला संघटितपणे आधार देण्याचे काम व्हावे. संकटातील महीलांना उद्योग उभा करुन त्यांना आर्थिक आत्मनिर्भर करण्याचे काम हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन माजी सभापती सुनीता दौंड यांनी केले. पंचायत समितीच्या सभागृहात स्टेट बँक ऑफ इंडिया अधिकारी असोएशियन, कोरोना एकल महिला पुर्नवसन समिती, स्नेहालय उडान बालविवाहमुक्त अभियान,पंचायत समिती पाथर्डी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या सयुंक्त विद्यमाने एकल महिलांना शिलाई यंत्रांचे वाटप करण्यात आलेे. त्यावेळी दौंड बोलत होत्या.
यावेळी स्टेट बँकेचे शाखेचे प्रबंधक नितीन वानखेडे, उपप्रबंधक मनोज जाधव, उमदचे जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब सरोदे, उमेदचे तालुका व्यवस्थापक अण्णासाहेब मोरे, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या पी.बी. गोरे, राजेंद्र सावंत, किसन आव्हाड ,अनिता पालवे, स्नेहालय उडानचे प्रवीण कदम, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब लाहोटी, अमोल घोलप, गोरक्ष ढाकणे, जालिंदर शिरसाट, पार्वती खेडकर, रंजना सावंत, रेणुका कराड, शालिनी आव्हाड, राजेश केडाळे उपस्थित होते.
कोरोनात घरातील कर्ता पुरुष गेल्याने एकल झालेल्या महिलांना जगण्याची उभारी देण्यासाठी कोरोना एकल समिती व इतर विभागांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. संकटात असलेल्या महिलांना आधार देण्याचे काम संघटितपणे केले पाहिजे, शिलाई यंत्र देऊन कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल, सरकाराच्या योजना गरिबांच्या झोपडीत पोहोचविण्याचे काम करणारे हात ही पवित्र असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे यांनी केले. प्रस्ताविक किसन आव्हाड, तर सूत्रसंचालन राजेंद्र सावंत यांनी करुन आभार मानले.
यांना शिलाई यंत्रांचे वाटप
आरती दहीफळे (चिंचपूर इजदे), मनीषा कराळे (कडगाव), जयश्री टाकसाळ (मोहोजदेवढे), आरती देशमुख (कोरडगाव), चित्रा पवळे (खरवंडी) यांना शिलाई यंत्रांचे वाटप करण्यात आले.