कोपरगावातील 84 लाखांची विकासकामे मंजूर : आ. काळे

कोपरगावातील 84 लाखांची विकासकामे मंजूर : आ. काळे

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : विविध विकासकामांना निधी मिळावा, यासाठी सादर केलेल्या प्रस्तावांची महायुती शासनाने दखल घेऊन, आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून कोपरगाव मतदारसंघातील 8 गावांमध्ये 84 लाख खर्चाच्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, असे आ. काळे यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाचा आमदार या संधीचा उपयोग करून घेत मतदारसंघाच्या विकासासाठी सतत धडपड करून निधी मिळविण्याचा आ. काळे यांचा सपाटा सुरूच आहे. गेल्या साडेचार वर्षांत 2900 कोटी खर्चाच्या निधीला गवसणी घालण्यात त्यांना यश आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 84 लाखाच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली.

राहाता तालुक्यातील चितळी येथे श्री मारूती मंदिर ते (स्टेशनवरील) ग्रा. पं. मालमत्ता क्र. 862 या जागेत सुशोभीकरण करणे (10 लाख), धनगरवाडी येथे श्रीहनुमान मंदिर परिसरात ग्रामपंचायत मालमत्ता क्र. 1 जागेत पेव्हर ब्लॉक बसविणे (9.99 लाख), रामपूरवाडी येथे श्रीस्वामी समर्थ मंदिर परिसरात ग्रामपंचायत मालमत्ता क्र. 852 जागेत पेव्हर ब्लॉक बसविणे (4 लाख), कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथे ग्रा. पं. गट क्र. उपविभाग 70/9 जागेत सभागृह बांधणे (10 लाख), भोजडे येथे ग्रा. पं. मालमत्ता क्र. 319 जागेत सभागृह बांधणे (9.99 लाख), मळेगाव थडी येथे चारी नं. 5 तुकाराम रक्ताटे वस्ती ते योगेश खोंडेवस्ती रस्ता करणे (19.99 लाख), रांजणगाव देशमुख येथे चांनखनबाबा मंदिर ते अशोक खालकर रस्ता करणे (9.99 लाख), लौकी गाव ते कोळनदी (तळेगाव रोड) रस्ता करणे (9.99 लाख) या विकासकामांना या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली.

याबद्दल आ. काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे आभार मानले. चितळी, धनगरवाडी, रामपूरवाडी, जेऊर पाटोदा, भोजडे, मळेगाव थडी, रांजणगाव देशमुख येथील नागरिकांनी आ. काळे यांचे आभार मानले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news