श्रीगोंद्यातील घायपतवाडीत दत्त मूर्तीची विटंबना

श्रीगोंद्यातील घायपतवाडीत दत्त मूर्तीची विटंबना

श्रीगोंदा/काष्टी : पुढारी वृत्तसेवा :  श्रीगोंदा तालुक्यातील न्हावरे-श्रीगोंदा-बीड महामार्गालगत घायपतवाडी जवळील सुमारे 50 वर्षांपूर्वीच्या दत्त मंदिरातील दत्त मूर्तीची समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेमुळे नागरिक संताप व्यक्त केला.
या ठिकाणी दत्त जयंतीला औटेवाडी, श्रीगोंदा शहर, हिरडेवाडी, दांडेकर मळा, आळेकर मळा, सप्रेवाडी, कुदळे मळा, मेहेत्रे मळा, आढळगाव, श्रीगोंदा-बीड महामार्ग असल्यामुळे हजारो भाविक येतात. काही लोकांनी चोरीच्या उद्देशाने विटंबना करीत मंदिरातील दोन पितळी घंटा चोरून नेल्या. भाविकांच्या भावना दुखवल्याने संताप व्यक्त होत आहे. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली. या संदर्भात पोलिस निरीक्षक ढिकले यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही.

दत्त मंदिर 50 वर्षांपूर्वीचे आहे. दत्त जयंतीला हजारो भाविक येथे उत्सवास येतात. मूर्तीच्या खाली सोने असेल, अशा संशयावरून चोरट्यांनी मूर्ती काढून बाहेर टाकली असावी. मंदिरातील दोन पितळी घंटा चोरीस गेल्या आहेत. श्रीगोंदा पोलिसांनी तत्काळ या आरोपींना अटक करावी.
                                                    – अनिल हिरडे, सामाजिक कार्यकर्ते

श्रीगोंदा पोलिस ठाण्यात या घटनेबाबत पत्र दिले आहे. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोणीतरी नास्तिक व्यक्तीने असे कृत्य केले असावे.
                                       – श्रीकांत मारकड, अधीक्षक, बेगर होम, घायपतवाडी

गुुरुवारी मंदिरात येत असतो. या घटनेचा तीव्र निषेध करतो. रिलायन्स कंपनीने जाणून-बुजून मंदिराच्या अगदी जवळून पाईपलाईनचे खोदकाम केलेे. कंपनीने मंदिराचे काम करून द्यावे.
                                                               – कारभारी बोरूडे, ग्रामस्थ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news