नगर : गोदावरी धाम सरला-पंढरपूर दिंडीचे उद्या प्रस्थान

नगर : गोदावरी धाम सरला-पंढरपूर दिंडीचे उद्या प्रस्थान

शिरसगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  श्रीक्षेत्र गोदावरी धाम सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र गोदावरी धाम सरला ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा उद्या (दि. 13 ते 30 जून) या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. पायी दिंडीचे प्रस्थान उद्या रोजी होणार आहे.

भास्करराव गलांडे पा. विद्यालय उंदिरगाव येथे दिंडीचा मुक्काम, (दि. 14 जून उंदिरगाव, ब्राम्हणगाव, शिरसगाव, श्रीरामपूर मार्गे उत्सव मंगल कार्यालय श्रीरामपूर येथे मुक्काम, (दि.15जून) रोजी श्रीरामपूर- बेलापूर- देवळाली प्रवरा मार्गे सहारा मंगल कार्यालय देवळाली येथे मुक्काम, (दि. 16) रोजी राहुरी मार्गे राहुरी नगर पालिका केशररंग मंगल कार्यालय येथे मुक्काम, (दि. 17 ) खडांबा व देहरे हायस्कूल मुक्काम, (दि. 18) विळद- नगरमार्गे मधुबन मंगल कार्यालय वाकोडी येथे मुक्काम, (दि. 19) प्रियदर्शनी दूध संघ व व्यायाम शाळा, आंबीलवाडी मुक्काम, (दि. 20) थेरगाव, मिरजगाव, भारत विद्यालय, मिरजगाव मुक्काम, (दि. 21) श्री अमरनाथ विद्यालय, कर्जत, (दि. 22) नालबंद मंगल कार्यालय, नगर रोड करमाळा, (दि. 23) मलवडी, करमाळा, (दि. 24) राजू पा. येवले असो. सदस्य. एमआयडीसी, (दि.25) सुवर्ण गार्डन मंगल कार्यालय, कुरकंब मुक्काम, (दि. 26 ते 29 जून) पंढरपूर मठ येथे मुक्काम होणार आहे.

दिंडी उतरण्याचे ठिकाण-सद्गुरु गंगागिरी महाराज मठ, (दि. 29 जून) दुपारी 4 वाजता महंत रामगिरी महाराज यांचे हरि कीर्तन होणार आहे. शुक्रवार (दि. 30) रोजी सकाळी 9 वा. गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने दिंडीची सांगता होईल. दिंडीत सहभागी होणार्‍या वारकरी यांनी सरला बेट येथे नोंदणी करणारांच दिंडीत प्रवेश व पास मिळेल. 60 वर्षांवरील भाविकांना दिंडीत सहभागी होता येणार नाही. नियोजन समितीचे मधुकर महाराज, विक्रम महाराज, डॉ. कोते व मंडलिक, दशरथ वर्पे, रविंद्र जाधव यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news