नगर : 74 लाख विद्यार्थ्यांचा डाटा जुळेना; आधार वैधता तपासण्याची सुविधा शाळेतच!

नगर : 74 लाख विद्यार्थ्यांचा डाटा जुळेना; आधार वैधता तपासण्याची सुविधा शाळेतच!

नगर; पुढारी वृत्तसेवा : इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करून स्टुडंट पोर्टलवर माहिती अपडेट करणे शाळांसाठी बंधनकारक आहे. मात्र शाळांकडून सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्राप्त झालेले नाहीत. त्यातच राज्यभरात तब्बल 73 लाख 80 हजार विद्यार्थ्यांची स्टुडंट पोर्टलवरील आधारविषयीचा डेटा जुळत नसल्याची बाब उघड झाली आहे. आधार अपडेशनची प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. आता विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची वैधता तपासण्याची सुविधा शाळास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली

गाडगे म्हणाले, शालेय पोषण आहार, 'आरटीई' प्रवेश, शिष्यवृत्ती योजना, मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप यासह विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यात येतो. प्रत्येक योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचा आधार संलग्नित मास्टर डेटाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नोंदीनुसारच निधी वितरीत करण्यात येणार आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांचा योजनांना पारदर्शकपणे लाभ घेता येणार आहे. शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये आधारप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांचे नाव असावे, अशी तरतूद आहे.

वारंवार सूचना देवूनही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्राप्त झालेले नाहीत. विद्यार्थ्याची आधार वैधता तपासणीत अधिक सुलभता यावी यासाठी कार्यपध्दतीत सुधारणा करण्यात आली आहे. यापुर्वी 'एनआयसी' मार्फत ही सुविधा उपलब्ध होती. मात्र कामकाजासाठी खूप वेळ लागत असल्याने व शाळांना अपडेट लवकर समजत नव्हते. यामुळे आता शाळास्तरावर सुविधा सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी दिली.

माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर. योगेश हराळे, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे आदींनी दिली आहे.

आधार नोंद द्यस्थिती
एकूण विद्यार्थी 2,13,79,258
…………………..
आधार नोंदणी 2,09,46,070
नोंदणी न केलेले
4,33,188,
अपडेशन झालेले 1,78,12,812
……………………..
नोंदणी पात्र
1, 35, 65, 727,
अपात्र
42, 47,085,
माहिती न जुळणे 31,33,258

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news