दि. अहमदनगर मर्चंटस् बँक : पुन्हा सत्ताधार्‍यांनाच कौल

दि. अहमदनगर मर्चंटस् बँक : पुन्हा सत्ताधार्‍यांनाच कौल
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : दि. अहमदनगर मर्चंट बँकेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर मतदारांनी सत्ताधारी मंडळाला कौल देत विरोधकांना डावलले. ज्येष्ठ नेते हस्तीमल मुनोत यांच्यावर विश्वास व्यक्त करत सभासदांनी बँकेच्या चाव्या पुन्हा दिल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. मुनोत यांच्या मंडळाची एक जागा निवडणुपूर्वीच बिनविरोध झाली होती. मर्चंट बँकेचे 17 हजार 508 सभासद आहेत. बँकेवर अनेक वर्षापासून हस्तीमल मुनोत यांची सत्ता आहे. रविवारी बँकेच्या 16 जागांसाठी मतदान झाले.

8518 अर्थात केवळ 48 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे कमी टक्केवारीचा फटका नेमका कोणाला बसतो, याची उत्सुकता असल्याने नगरकरांचे निकालाकडे लक्ष लागले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनात मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासून ते शेवटपर्यंत सत्ताधारी गटाची निकालावर पकड राहिली.

विजयी उमेेदवार: सर्वसाधारण ः अनिलकुमार पोखरणा ( 7603), कमलेश भंडारी (7580), आनंदराम मुनोत (7540), संजय बोरा (7527), किशोर गांधी (7460), हस्तीमल मुनोत (7455), अमित मुथा (7440), अजय मुथा ( 7428), मोहनलाल बरमेचा (7414), संजयकुमार चोपडा (7392), किशोर मुनोत ( 7212), संजीव गांधी (7180), अनु.जाती-जमातीः सुभाष बायड (बिनविरोध), महिला राखीवः प्रमिला हेमराज बोरा (7710), मीना वसंतलाल मुनोत (7601). इतर मागासवर्ग ः विजयकुमार कोथंबिरे (7360), आणि भ.वि.जाती जमाती ः सुभाष भांड (7440),

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news