नगर : मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंडळांचे अध्यक्ष, डीजे मालकांवर गुन्हे

नगर : मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंडळांचे अध्यक्ष, डीजे मालकांवर गुन्हे

नगर : पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले जयंती मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन मंडळांचे अध्यक्ष व डीजे मालक अशा सहा जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोपनीय शाखेचे सहायक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी फिर्याद दिली आहे. महात्मा फुले जयंती उत्सव समिती मंडळाचे अध्यक्ष कमलेश लक्ष्मण जंजाळे (रा. कबाडगल्ली, माळीवाडा), डीजे मालक साईनाथ मधुकर उंदरे (रा. मांजरी, पुणे), सकल हिंदू समाज मंडळाचे अध्यक्ष ओंकार विजय लेंडकर (रा. लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड), डीजे मालक अभिषेक रवींद्र चव्हाण (रा. जावळी, जि. सातारा), युवा प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष मळू लक्ष्मण गाडळकर (रा. भवानीनगर), डीजे मालक गणेश तुकाराम मोरे (रा. मांजरी खुर्द, जि. पुणे) या सहा जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तरुणाविरुद्ध गैरवर्तनाचा गुन्हा
दरम्यान, महात्मा फुले जयंती मिरवणुकीत मद्यपान करून गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृणाल घनश्याम शिवंदे (रा. बेल्हेकर वस्ती, मांजरी, जि. पुणे) असे त्याचे नाव असून, गोपनीय शाखेचे हवालदार उमेश शेरकर यांनी याबाबत फिर्याद दिली.

मंगळवारी (दि. 11) मिरवणुकीत डीजेच्या वाहनावर कृणाल बेशिस्त वर्तन करताना आढळून आला. त्याने मद्यपान केले असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. वैद्यकीय चाचणीनंतर त्याच्याविरुद्ध मिरवणुकीत मद्यपान करून गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news