माजी नगरसेवकांचे खड्ड्यात उपोषण, नवीन रस्ता खोदला; महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

माजी नगरसेवकांचे खड्ड्यात उपोषण, नवीन रस्ता खोदला; महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी
Published on
Updated on

नगर: सावेडी उपनगरातील पाईपलाईन हाडकोमध्ये म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू आहे. मंगळवारी त्या ठेकेदाराने पाईपलाईन टाकण्यासाठी नव्याने केलेला रस्ता खोदला. विशेष म्हणजे मनपाने त्यासाठी परवानगी दिली होती. त्याविरोधात माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार यांनी खड्ड्यात उपोषण सुरू केले.

सावेडी उपनगरातील पाईपलाईन हाडको येथे म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू आहे. याभागात गेल्या 25 वर्षात रस्त्याचे काम झाले नव्हते. नगरसेवक रुपाली वारे यांनी पाठपुरावा करून आमदार संग्राम जगताप यांच्या स्वनिधीतून येथील रस्त्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. दोन महिन्यांपूर्वी पाईपलाईन हाडको परिसरात नव्याने रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी म्हाडा इमारतीचे काम करणार्‍या ठेकेदाराने पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदला. माजी नगरसेवक निखील वारे व बाळासाहेब पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी संबंधित ठेकेदार व म्हाडाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन रस्त्यावरून पाईप लाईन करायची असल्यास करू घ्या असे सांगितले होते. मात्र, त्यावेळी संबंधित अधिकार्‍यांनी त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. आज त्यांनी पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदला. त्यामुळे माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार यांनी सायंकाळपासून रस्त्यावर खोदलेल्या खड्डयात उपोषण सुरू केले. त्या खोदकामासाठी मनपाने परवानगी दिल्याने संबंधितांवर करवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

आम्ही निधी आणण्यासाठी पाठपुरवा करतो. शहरात विकासकामे व्हावे यासाठी आम्ही धावपळ करतो. मात्र, हे असे अधिकारी रस्ता खोदत असतील तर कसा शहराचा विकास होणार. अधिकार्‍यांवर कारवाई होईपर्यंत आम्ही येथून उठणार नाही.
– निखिल वारे, माजी नगरसेवक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news