विकासाच्या माध्यमातून नागरिकांशी बांधिलकी कायम : शालिनीताई विखे पाटील

विकासाच्या माध्यमातून नागरिकांशी बांधिलकी कायम : शालिनीताई विखे पाटील
Published on
Updated on

राहाता : पुढारी वृत्तसेवा : राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात चौथी विखे पाटील कुटुंबातील पिढी काम करत असताना, सत्ता असो किंवा नसो नागरिकांशी बांधिलकी कायम राहिली आहे. सरकारमध्ये असताना जे जे खाते मिळाले त्याचे सोने करून कायापालट करून विकासकामांचा डोंगर उभा करताना गट-तटाचे राजकारण केले नसल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले. चितळी (ता. राहाता) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी साठवण तलाव व पाण्याची टाकी सुमारे दोन कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेचे व सव्वापाच कोटी रुपये विविध विकासकामाचे भूमिपूजन व उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब वाघ होते.

या वेळी विखे पाटील म्हणाल्या की, विखे पाटील कुटुंबाने नेहमी विकास हाच ध्यास घेऊन काम केले. येथील शेतकरी वर्गाचा असलेला जिव्हाळ्याचा निळवंडे व गोदावरी कालव्याच्या व पोटचार्‍यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, तळ्याच्या संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली. या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अ‍ॅड. अशोकराव वाघ यांनी मनोगत व्यक्त करून, निळवंडे धरणाच्या पोटचार्‍यांची कामे प्राधान्याने करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी या वेळी केली.

या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य कविता लहारे, पंचायत समितीच्या सदस्य अर्चना लहारे, माजी उपसभापती अलका वाघ, चितळीच्या उपसरपंच कविता पगारे, अ‍ॅड. अशोक वाघ, खा. सुजय विखे पाटील मंचचे अध्यक्ष शैलेश वाघ, गटविकास अधिकारी पठारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुंजाळ, चव्हाण, अभियंता धापटकर, पाणीपुरवठाचे पिसे, वाघमारे, बचत गटांच्या रुपाली वाघ, सेवा सोसायटीच्या नंदाताई वाघ, सेवा संस्था अध्यक्ष रेवनाथ वाघ, पत्रकार विष्णू वाघ, शिवाजी वाघ, उपाध्यक्ष संदीप वाघ, माजी उपसरपंच सोनाली वाघ, विलास वाघ ग्रामपंचायत सदस्य राजू वाणी, सुवर्णा माळी, दत्तात्रय सुसरे, विक्रम वाघ, सोनाजी पगारे, काळे प्रतिष्ठानचे दीपक वाघ, नंदू गायकवाड, रवींद्र वाघ, रमेश वाघ, सुभाष वाघ, बाळासाहेब वाघ, सोपान वाघ, शिवाजी कदम, रूपेश गायकवाड, रमेश जाधव, जीवन वाघ, मजिनाथ वाघ, सुरेश वाघ, संभाजी तनपुरे, सुभाष तनपुरे, अनिल वाघ, ग्रामविकास अधिकारी मधुकर आंग्रे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पत्रकार विष्णू वाघ यांनी केले. सूत्रसंचालन सेवा संस्था संचालक रेवनाथ वाघ यांनी केले. आभार शैलेश वाघ यांनी मानले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news