म्हाळुंगीच्या पुलासाठी नागरिक एकवटले

म्हाळुंगीच्या पुलासाठी नागरिक एकवटले

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर हा म्हाळुंगी नदीवरील पूल पडून एक वर्ष झाला आहे. सध्या या नदीला पाणी नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने या पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र, अध्याप तरी पालिकेने कुठल्या प्रकारचे पाऊल उचलले नसल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकत्रित येत या पुलाच्या दुरुस्तीसाठी आरपारची लढाई करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन आणि परिसरातील नागरिक असा संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे आहेत.

संगमनेर शहरातून साईनगर पंपिंग स्टेशन या परिसरामध्ये राहणार्‍या नागरिकांसाठी जाण्या- येण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. मात्र म्हाळुंगी नदीवरती अनेक वर्षांपूर्वी बांधलेला हा पूलच मागील वर्षी नदीला पूर आल्यामुळे अचानक खचला. त्यामुळे नगरपालिकेच्या प्रशासनाने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून हा पूल वाहतुकीसाठी तसेच पायी प्रवास करण्यासाठी बंद केला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक महिला विद्यार्थी वृद्ध या सर्वांना कासारवाडी हेल्थ क्लब रोडने संगमनेरला जावे यावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील शाळेत जाणार्‍या मुलांची तसेच वृद्ध महिला पुरुषांचे हाल होत आहे.

नगरपालिका प्रशासनाकडे या परिसरातील नागरिकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या नंतर नगर पालिका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्ग म्हणून एक छोटा पूल तयार केला आहे. मात्र पावसाळा अवघ्या एक ते दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्या पावसाळ्यात हा पूल तग धरू शकणार नाही.

प्रांताधिकारी कार्यालयावर आज मोर्चा
स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिराकडे जाणारा महाळुंगी नदीवरील पूल खचल्यामुळे तो रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.त्या मुळे परिसरातील नागरिकांचे हाल होत आहे. या पुलाची दुरुस्ती नगरपालिका प्रशासनाने त्वरित सुरू करावी, या मागणीसाठी संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रांताधिकारी तथा नगरपालिकाचे प्रशासक डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्या कार्यालयावर आज (दि. 24) सेमवारी धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माजी नगरसेविका अल्पना तांबे यांनी प्रसिद्धीपत्रकारद्वारे सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news