संगमनेर : खेमनर बाजार समितीचे सभापती ; उपसभापतीपदी गायकवाड यांची निवड

संगमनेर : खेमनर बाजार समितीचे सभापती ; उपसभापतीपदी गायकवाड यांची निवड
Published on
Updated on

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी साकूर गटातील शंकरराव हनुमंता खेमनर यांची फेरनिवड झाली आहे. उपसभापतीपदी आश्वी गटातील गीताराम दशरथ गायकवाड यांची एकमताने निवड झाली आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णयाधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये शंकर खेमनर यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली असल्याची सूचना संचालक कैलास पानसरे यांनी मांडली. तर संचालकनिलेश कडलग यांनी अनुमोदन दिले.

तसेच व्हा.चेअरमन पदासाठी गीताराम गायकवाड यांच्या नावाची सूचना संचालक अरुण वाघ यांनी मांडली तर संचालक सतीश खताळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभापतीपदी शंकर खेमनर तर उपसभापती गीतराम गायकवाड यांची निवड करण्यात आली.
या निवडीनंतर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा यशोधन जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी समवेत डॉ. जयश्री थोरात, कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, निवडणूक सहाय्यक अधिकारी म्हणून सचिव सतीश गुंजाळ यांनी काम पाहिले.

नूतन पदाधिकारी एकदिलाने काम करतील

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या माध्यमातून शेतकरी व्यापारी यांना अत्याधुनिक सुविधा देत विविध ठिकाणी उपबाजार समित्या सुरू केल्या आहेत.या बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आलेले सर्व संचालक एकदिलाने काम करून बाजार समितीचा गौरव वाढवतील, असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news