संगमनेर : भाजपाकडून लोकशाही, संविधान संपविण्याचा प्रयत्न : आ. थोरात

संगमनेर : भाजपाकडून लोकशाही, संविधान संपविण्याचा प्रयत्न : आ. थोरात

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करीत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले आहे. त्यांची खासदारकी रद्द करून भाजप एकप्रकारे लोकशाहीसह संविधान संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.

काँग्रेस युवा नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती अदानी यांच्या संबंधावर लोकसभेत जाब विचारला तसेच केंब्रिज विद्यापीठातील विधानावर राहुल गांधी यांनी माफी मागवी, अशी मागणी विरोधकांनी केली म्हणून त्यांना लोकसभेत बोलूही दिले नाही. त्यांना शिक्षण ठोठावून लगेच खासदारकी रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आ. थोरात बोलत होते.

आ. थोरात म्हणाले, गेल्या 9 वर्षांपासून केंद्रातील मोदी सरकार फक्त निरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या सारख्या भ्रष्ट लोकांसाठी काम करीत आहे तर राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठविला म्हणून त्यांचा आवाज बंद करण्याचा काम सत्ताधारी भाजप करीत असल्याची टीका आ. थोरात यांनी केली.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीवरील हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर भाजप राहुल गांधी यांना जास्त घाबरू लागला आहे. लोकसभेत राहुल गांधी यांनी अदानी-मोदी संबंधाचा मुद्दा उपस्थित केला होता, यातूनच भाजपाने सूडबुद्धीने कारवाई केली आहे. केंब्रिज विद्यापीठातील विधानावर लोकसभेत बोलू दिले नाही, त्यांचा माईक बंद करण्यात आला, असे सांगत आ. थोरात म्हणाले, देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे चालली आहे, याचा हा पुरावा आहे.

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी अशा व्यवस्थेचा सामना केला होता. आता राहुल गांधीसुद्धा त्याच व्यवस्थेचा सामना करीत आहेत. या अत्याचारी व्यवस्थेला तोंड देत स्व. इंदिरा गांधी यांनी जनता पक्षाचा पराभव करुन, पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या होत्या. राहुल गांधी हेसुद्धा भाजपाचा पराभव करून देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news