आशा स्वयंसेविकांच्या प्रश्नांवर आवाज उठवू : राम शिंदे

आशा स्वयंसेविकांच्या प्रश्नांवर आवाज उठवू : राम शिंदे

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसंदर्भात विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात आवाज उठवून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन आमदार प्रा. राम शिंदे यांनी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाला चौंडी येथील निवासस्थानी दिले. आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति-समितीने विविध मागण्यांसाठी यापुर्वी संप पुकारला होता. यावेळी शिष्टमंडळाशी वाटाघाटी करताना आरोग्य मंत्र्यांनी विविध मागण्या मान्य केल्या होत्या.

यामध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट 2 हजार रूपये, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 7 हजार रुपये वाढ, गटप्रवर्तकांचा मोबदल्यात 10 हजारांची वाढ करण्यात आली होत्या. त्याची अंमलबजावणी न झाल्याने कालपासून राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिष्टमंडळाने काल आमदार शिंदे यांची चोंडी येथे भेट घेतली. यावेळी आमदार शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

एस. एस. शिरोळे, एन. बी. शिंदे, एस. ए. साळवे, एस. ए. मोरे, एम. पी. शिंगणे, रेखा कापसे, जयश्री जाधव, आशा टेपाळे, शबाना बागवान, सविता जाधव, स्वाती हुलगुंडे, मनीषा शिलवंत, जया साळूंके, मैना हुलगुंडे, शाहिस्ता सय्यद, सादिका शेख, माधुरी बेलदार, मनीषा बिरंगळ, कल्पना चिंतामणी आदी उपस्थित होत्या.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news