

कोळगाव; पुढारी वृत्तसेवा : येथील माऊली कृषी सेवा केंद्राचे संचालक सागर नलगे व एस. व्ही. अॅग्रो सोल्युशन्स टेक्निकचे सेल्स ऑफिसर अविनाश डुबल यांनी सांगितलेले तंत्रज्ञान व मार्गदर्शनातून पडिक माळरानावर नानासाहेब बांदल यांनी दोन एकरांत सात लाख रुपये कमावले. सागर नलगे म्हणाले, एस. व्ही. अॅग्रो सोल्युशन टेक्निकच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून नानासाहेब बांदल यांनी दोन एकरात 59 दिवसांत सात लाखांचे कलिंगड लागवडीतून उत्पन्न मिळविले. त्यासाठी सर्वप्रथम आठ गुणिले चारचे बेड तयार केले.
त्यात एस व्ही फ्रूटर, एस व्ही कॅन्टर, मायक्रो न्यूट्रिएंट, बायोझाईन, पोटॅश व 1026 च्या दोन गोण्याचा भेसळ डोस दिला. पाण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला. मल्चिंग कागद अंथरून सव्वा फुटांवर झिगझॅग पद्धतीने कलिंगडाच्या रोपांची लागवड केली. सेंद्रिय द्रव्य एस. वी. शुगरबन, एस. व्ही, साईज बिल्डरचा वापर केल्याने फळ मोठे झाले. दोन एकरात 70 ते 80 टन कलिंगडाचे उत्पादन मिळाले.
जागेवरच दहा रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला. त्यासाठी एक लाख तीस हजार रुपये खर्च आला. खर्च वजा जाता 5 लाख 70 हजार रुपये निव्वळ नफा बांदल यांनी कमावला. या प्लॉटला श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, कुकडी कारखान्याचे संचालक मच्छिंद्र नलगे, माजी उपसरपंच नितीन नलगे, संकेत नलगे, नितीन लगड, जीवन लगड, अमित नलगे यांनी भेट देऊन कौतुक केले.