तीन राज्यमार्गांच्या चौपदरीकरणास मंजुरी : आमदार मोनिका राजळे

तीन राज्यमार्गांच्या चौपदरीकरणास मंजुरी : आमदार मोनिका राजळे

; मतदारसंघात 21.83 कोटींच्या रस्ता कामांचे भूमिपूजन

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : दीड वर्षात ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 250 कोटींचा निधी मतदारसंघात आला आहे. आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात 70 किलोमीटर रस्ते मंजूर झाले आहेत. तीन राज्यमार्गाच्या चौपदरीकरणास मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. मुख्यमंत्री ग्रामसडक, अर्थसंकल्पीय तरतुद, केंद्रीय रस्ते अनुदान, लेखाशीर्ष 25-15 अंतर्गत चितळी ते बर्‍हाणपूर, हिंगणगाव त अडबंगीनाथ, ढोरजळगाव ते भातकुडगाव, जवखेडे ते कासार पिंपळगाव, भातकुडगाव नजनवस्ती ते भायगाव, सामनगाव मळेगाव मिरी रस्ता दुरुस्ती, आव्हाणे बु ते मळेगाव, कासार पिंपळगाव ते जवखेडे, अमरापूर चौधरी वस्ती पागोरी पिंपळगाव या 21 कोटी 83 लक्ष रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन सोमवारी (दि.4) आमदार राजळे यांच्या हस्ते झाले.

यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी जि. प. सदस्य राहुल राजळे, बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, ताराचंद लोढे, महादेव जायभाय, आशा गरड, कचरू चोथे, संदीप वाणी, रामदास दिवटे, अजित चोरडिया, अनिल खैरे, रामदास दिवटे आदी उपस्थित होते.
आमदार राजळे म्हणाल्या, आघाडी शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 20 हजार किलोमीटर रस्ते करण्याची फसवी घोषणा केली होती. आता शिंदे, फडणवीस, पवार शासन येताच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आपल्या मतदार संघात 70 किलोमीटर रस्ते या योजनेतून मंजूर झाले आहेत. ग्रामीन रस्त्यांचा विचार करता दीड वर्षात जवळपास 250 कोटी रुपयांचा निधी आला आहे. तिसगाव-गेवराईसह तीन रस्ते यामध्ये मंजूर झाले असून, ते टप्याटप्याने चारपदरी होणार आहेत. शेवगाव व पाथर्डी नगरपरिषदेस 25 कोटींचा निधी आला आहे.

पाटपाण्याचा त्रास दोन-तीन वर्षांपासून कमी झाला आहे. पाटपाण्याबाबत आपण सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न करतो. एवढा मोठा निधी आणला, त्यामुळे आमचीही काही अपेक्षा असते. लोकप्रतिनिधीचे काय काम आहे, हे आम्हाला मांडावे लागते. निवडणूक असो किंवा नसो, आपण संघटनेचे काम करत असतो. संघटनेच्या बळावर निवडणूक करतो. आपल्या मतदार संघात नमो अ‍ॅपला कमी व्यक्ती जोडल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी या अ‍ॅपशी संलग्न व्हावे. तसेच, होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत गावागावातून भाजपा युतीच्या उमेदवारांच्या भरघोस मतदान करावे, असे आवाहन आमदार राजळे यांनी यावेळी केले.

कुणाचं फोटोसेशन, कुणी अंघोळ घालतंय!

मतदारसंघात अगोदर कोणी फिरत नव्हते. आता सर्व जण फिरायला लागलेत. कोणी फोटोसेशन करतेय, तर कोणी कोणाला अंघोळ घालतंय. खरं तर हे लोकप्रतिनिधीचे काम नाही. सुख-दुःखात सहभागी होणे, विकासकामे करणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहे, असे सांगत आमदार राजळे यांनी विरोधकांवर टीका केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news