

अकोले; पुढारी वृत्तसेवा : अमृतसागर सहकारी दूध संघाच्या संचालक निवडणुकीत आज (सोमवारी) माघारीच्या शेवट दिवसापर्यंत मातब्बरांसह 46 जणांनी माघार घेतल्याने 15 जागांसाठी 30 उमेदवार निवडणूक रिगणांत राहिले आहेत. दरम्यान, येत्या 8 जानेवारी रोजी मतदान होत आहे. विद्यमान अध्यक्ष व माजी.आ.वैभव पिचड यांचे शेतकरी विकास मंडळ तर ज्येष्ठ नेते सीताराम पा गायकर,आ. डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडिच्या शेतकरी समृद्धी मंडळ या पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे.
अमृतसागर दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक पुढे ढकलल्यानंतर औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशाने निवडणूक प्रक्रिया होत आहे. येत्या 8 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंंतिम मुदत आज 26 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यत होती. \मध्यंतरीच्या काळात अनेक बैठकातुन बिनविरोध होण्याच्या चर्चा झाल्या, मात्र त्याला यश आले नाही. आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केलेले तालुक्यातील प्रमुख मातब्बर राजकारण्यांनी अर्ज माघारी घेतले.
यामध्ये जि. प .अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव चासकर,जनलक्ष्मी पतसंस्था अध्यक्ष भाऊ पा. नवले, अमृतसागर दूध संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव डुंबरे, काँग्रेसचे नेते अॅड. के. बी. हांडे, बाजार समितीचे माजी संचालक भाऊसाहेब कासार,बादशहा एखंडे, सुगावचे माजी सरपंच सुनिल देशमुख, कैलास जाधव,गौराम ताजने, प्रविण धुमाळ, शिवसेनेचे नेते महेश नवले, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, अकोले सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पानसरे,प्रकाश देशमुख ,कैलास पुंडे,रेवचंद भोर,राजेंद्र वाकचौरे, भानुदास डोंगरे,दत्तू वाकचौरे, सतीश फापाळे, आबाजी तळेकर, पांडुरंग कचरे,बाळासाहेब वाकचौरे, माधव चौधरी,नितीन नवले, राधाकीसन कोटकर, बाळासाहेब भांगरे, रामनाथ आरोटे, लताबाई अशोक देशमुख, नंदा कचरे,दीपाली देशमुख, शोभा आरोटे,कुमुदिनी पोखरकर, शंकर डगळे,वसंत वाकचौरे, चित्रा धात्रक यांचा उमेदवारांचा समावेश आहे.
या निवडणुकीत 15 संचालकांच्या जागांसाठी 76 उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यातून आज 46 अर्ज माघारी झाल्याने 15 जागांसाठी 30 अर्ज राहिल्याने शेतकरी विकास मंडळ व शेतकरी समृद्धी मंडळामध्ये सरळ लढत होत आहे. भाजप कार्यालयात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आ. व अमृतसागर दूध संघाचे माजी अध्यक्ष वैभवराव पिचड यांनी शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार जाहीर केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष गिरजाजी जाधव,ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ,दुध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे,नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरेसह पदाधिकारी उपस्थित होते तर आ. डॉ. किरण लहामटे यांच्याशी चर्चा करून अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पा. गायकर, जि प अर्थ व बांध समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ,डॉ. मनोज मोरे यांनी जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या निवासस्थानी शेतकरी समृद्धी मंडळाची उमेदवार यादी जाहीर केली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
8 जानेवारी 2023 रोजी होत असलेल्या निवडणूक रिंगणात उभे असलेले शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार मतदारसंघ निहाय पुढील प्रमाणे- अनुसूचित जाती जमाती- वैभवराव मधुकरराव पिचड. सर्वसाधारण- रावसाहेब रामराव वाकचौरे, आप्पासाहेब दादा पा. आवारी, बाळासाहेब भाऊराव मुंढे, अरुण दिनकर गायकर, बबन किसन चौधरी, जगन वसंतराव देशमुख, सुभाष सूर्यभान डोंगरे, गंगाधर गणपत नाईकवाडी, रामदास किसन आंबरे, दयानंद नामदेव वैद्य. महिला राखीव-अश्विनी प्रवीण धुमाळ, सुलोचना भाऊसाहेब औटी. इतर मागासवर्ग- आनंदराव रामभाऊ वाकचौरे. भटक्या विमुक्त जाती-जमाती-बाबुराव शंकर बेणके.
शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार पुढील प्रमाणे- अनुसूचित जाती जमाती- नंदू संपत गंभीरे. सर्वसाधारण- विजय रंगनाथ शिंदे, रविंद्र पोपट हांडे,शरद कारभारी चौधरी, शिवाजी लक्ष्मण नवले,सोपान काशिनाथ मांडे, गोरक्षनाथ गणपत मालुंजकर, सुरेश संपत गडाख, प्रताप लक्ष्मण देशमुख, गुलाबराव पंढरीनाथ शेवाळे,दादा पा. रामभाऊ वाकचौरे. महिला राखीव -नलिनी भाऊसाहेब गायकर, अर्चना गौराम गजे. इतर मागासवर्ग- रामहारी गोपीनाथ तिकांडे.भटक्या विमुक्त जाती जमाती – सुभाष विठ्ठल बेनके उमेदवार आहेत.
पिचड विरुद्ध- आ. डॉ. लहामटेंची होणार लढत
दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष माजी आ. वैभवराव पिचड व कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, आ. डॉ. किरण लहामटे यांच्या दोन्ही पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे. अगस्ती कारखान्यानंतर तालुक्यात दुसरी शिखर संस्था अमृतसागर दूध संघाची निवडणूक होत आहे.
सत्ता मिळविण्याचा तर दुसरीकडे वचप्याची तयारी!
यात एकाबाजुने तालुक्यातील सर्व संस्थांच्या सत्ता मिळवण्यचा प्रयत्न तर दुसरीकडे पिचडांकडुन कारखाना निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.