अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत अद्याप चर्चा नाही – हंडोरे

अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत अद्याप चर्चा नाही – हंडोरे
Published on
Updated on

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : आज अनेक प्रश्नावर आम्ही चर्चा केली. परंतु, काही विषयांवर निर्णय झालेला नाही. काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. सर्वांनाच न्याय देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. शिवसेनेने अठरा जागेवर विजय संपादन केला. यात दोन गट निर्माण झाल्याने पक्षातंर्गत समस्येवरती संवाद साधून मार्ग काढला जाईल, शिर्डी लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार? या प्रश्नावर अद्याप कोणतीच चर्चा झाली नाही. पक्षांची चाचपणी सुरू असून लवकरच यावर निर्णय होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री आमदार चंद्रकांत हांडोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस सिटी मंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हंडोरे बोलत होते. यावेळी श्रीरामपूरचे आलहू कानडे, डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, संपर्क प्रमुख ज्ञानेश्‍वर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

हंडोरे म्हणाले, काँग्रेस हा अखंड पक्ष असून लोकशाही आणि संविधानास मानणारा असून पक्ष संघटनात्मक कार्य करीत आहे. येत्या दोन दिवसात निश्चित होईल असेही ते म्हणाले. निवडणूकीची पूर्वतयारी करीत असून लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावात चाचणी सुरू आहे. उत्तर आणि दक्षिण नगरच्या दोन्ही मतदारसंघांमध्ये आपल्यावर जबाबदारी सोपवली असल्याने राजकीय बलाबल, पक्ष संघटना, परिस्थिती, मजबुतीकरण यासाठी काय करता येईल त्याबाबत मार्गक्रमण सुरू आहे. विरोधकांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचे सांगत उलट जातीय, प्रांतभेद, धार्मिकतेढ निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. विरोधक विकास करीत असल्याची केवळ ओरड करीत आहे.

आपण मतदार संघातील जनतेची संवाद साधणार असून काँग्रेस साठी मतदार संघात पोषक वातावरण असल्याचेही ते म्हणाले. नगरपालिका, ग्रामपंचायत आदि शेवटच्या घटकांपर्यंत आपण पोहचून आढावा घेणार असून कोअर कमिटीचा रिपोर्ट १६ तारखेला पक्षश्रेष्ठीकडे सादर करणार असून निवडी बाबत आ बाळासाहेब थोरात व कोअर कमिटी मार्फत योग्य तो निर्णय घेण्यात येईल तद्वतच पक्षात नव पदाधिकार्‍यांना संधी देण्यात येणार असल्याचे हंडोरे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news