Ahilyanagar Crime News:
अहिल्यानगर: अहिल्यानगरमधील राघोरीतील एका तरुणीवर नाशिकच्या जंगलात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजला जाणाऱ्या तरूणीचे अपहरण केले आणि नाशिकच्या रामशेज किल्ल्याजवळच्या जंगलात पाच दिवस डांबून ठेवले होते. गुप्त माहिती आणि तपासावरून पोलिसांनी या मुलीचा शोध घेतला. तरुणीवरती अत्याचार करणाऱ्या तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील एका गावातील पीडित मुलगी १३ फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कॉलेजला जाते असं सांगून घरातून निघाली मात्र ती परत आलीच नाही. याबाबत तिच्या पालकांनी राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. गुप्त माहिती आणि तपासा दरम्यान मुलगी नाशिक जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार १८ फेब्रुवारीला रात्री उशिरा नाशिक सुरत रोड लगत रामशेज किल्ल्या जवळच्या जंगलातून या मुलीची सुटका करण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून पॉक्सो कायद्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी पीडितेची कॉलेजमधून अपहरण केले होते.