नगर: गुटख्याच्या गुन्ह्यातील दोघे अद्याप फरारच! एलसीबीकडून तपास; तिघांना न्यायालयीन कोठडी

file photo
file photo

नगर, पुढारी वृत्तसेवा: गुटखा प्रकरणात आरोपी असलेला गणेश हुच्चे व त्याचा साथीदार राहुल शर्मा हे दोघेही एलसीबीला अद्यापपर्यंत हाती लागले नसून इतर तीन आरोपींची बुधवारी (दि.21) न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

दिल्लीगेट येथे मोठ्या प्रमाणात गुटखा आणल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांच्या पथकाने शनिवारी (दि.17) ही कारवाई केली. 9 लाख 67 हजारांचा गुटखा जप्त करून दोन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी आणखी दोघांचा आरोपींमध्ये समावेश केला होता. तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे गेल्यानंतर गणेश हुच्चे याचा आरोपींमध्ये समावेश करण्यात आला. अटकेत असलेल्या तीन आरोपींना बुधवारपर्यंत (दि.21) न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. तिंन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हरिश खेमकरण खंडोजा (रा.प्रवरानगर, ता. राहता), दीपक पोपट यादव (रा. ब्राह्मणगल्ली, माळीवाडा) प्रफुल्ल शेटे (रा.सावेडी) अशी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींची नावे आहेत.

एकविरा चौकातून 35 हजारांचा गुटखा जप्त

तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकविरा चौकातून 35 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. तोफखाना पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक प्रियंका आठरे यांनी बुधवारी (दि.21) ही कारवाई केली. विशाल रमाकांत बोरूडे (रा.एकविरा चौक) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news