नगर : चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी ‘खंग्या’ जेरबंद

नगर : चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी ‘खंग्या’ जेरबंद
Published on
Updated on

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  महिलेच्या गळ्यातील गंठण चोरणार्‍या आरोपीस लोणी पोलिसांनी जेरबंद केले आहे. विनोद ऊर्फ खंग्या विजय चव्हाण (रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 25 डिसेंबर रोजी रस्त्याने पायी जात असलेल्या महीलेच्या गळयातील सोन्याचे दागीने मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी ओढून चोरून नेल्याची घटना घडलेली होती. याबाबत लोणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.  सदर गुन्हयातील आरोपीतांबाबत पथकातील पोलिस हवालदार इरफान शेख यांना गुप्त बातमीदाराबाबत माहिती मिळाली सदर गुन्हा हा विनोद ऊर्फ खंग्या विजय चव्हाण व त्याचे साथीदाराने केला आहे.

सदरची आरोपी मौजे कोळपेवाडी (ता . कोपरगाव) येथील पारधी वस्ती येथे लपून बसलेला आहे. तसेच साथीदार योगेश सिताराम पाटेकर (वय 21, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) हा पुणतांबा तसेच श्रीरामपूर भागात येणार असल्याने त्याला भेटण्यासाठी खंग्या येणार असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी पाठलाग करून आरोपीस पकडले.
लोणी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. आरोपींकडून चौकशी सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news