

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर खुर्द येथे टाटा टेम्पोने मोटारसायकल स्वाराला जोराची धडक दिली असता झालेल्या भीषण अपघातात संगमनेर खुर्द येथील वे वेल्डरचे काम करणारा संकेत रामू गायकवाड हा 25 वर्षीय तरुण जागीच ठार झाला. ही दुर्घटना आज (शनिवारी) सायंकाळी 6 वाजता घडली. संकेत वेल्डरचे काम करीत होता. नाशिक- पुणे महामार्गावरुन संगमनेरकडे जात असताना किसान ट्रान्सपोर्टजवळ त्याच्या मोटारसायकलला टाटा कंपनीच्या टेम्पोने गायकवाड यास जोराची धडक दिली. या अपघातात संकेत जागीच ठार झाला.
अपघातात गायकवाड यांच्या मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पो. ह. बाळासाहेब गायकवाड, अजय आठरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त टेम्पो ताब्यात घेतला. आपला मुलगा अपघातात ठार झाल्याचे ऐकून उपस्थित नातेवाईकांनी घटनास्थळी एकच हंबरडा फोडला.