नगर : रोडरोमिओला सक्तमजुरीची शिक्षा

नगर : रोडरोमिओला सक्तमजुरीची शिक्षा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  मोटारसायकलवरून येऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रोडरोमिओला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त व विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. मिनीनाथ दिलीप चव्हाण (वय 24, रा. जीएसपी इंम्पोरियम अपार्टमेंट, तपोवन रोड, नगर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी 11 ऑगस्ट 2021 रोजी गंगा उद्यान रस्त्याने भावासोबत सायकलवरून घरी जात होती. त्यावेळी मोटारसायकलवरून येऊन आरोपीने तिचा विनयभंग केला होता. तसेच, घटनेनंतर आरोपी त्याची मोटारसायकल भरधाव वेगाने घेऊन पळून गेला होता.

त्यानंतर पीडितेच्या घरच्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला तोफखाना पोलिस ठाण्यात हजर केले व मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.  गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीखक रवींद्र पिंगळे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे 5 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा ठोठावली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news