नगर : एचआयव्ही वधू-वर मेळावा : स्नेहातून अनोख्या रेशीमगाठी ! पाच दाम्पत्य बोहल्यावर

नगर : एचआयव्ही वधू-वर मेळावा : स्नेहातून अनोख्या रेशीमगाठी ! पाच दाम्पत्य बोहल्यावर
Published on
Updated on

नगरः पुढारी वृत्तसेवा : आयुष्याच्या एका वळणावर अचानक आपल्याला एड्सची बाधा झाल्याचे समजताच जीवनच निरागस होऊन जाते. मात्र अशाही परिस्थितीत हा जीवनाचा अंत नव्हे, तर नवी सुरुवात असू शकते, हे स्नेहालयने मनावर बिंबविण्याचा अनोखा अन यशस्वी असा प्रयत्न केला आहे. नुकताच स्नेहालयाच्या पुढाकारातून एड्स बाधितांसाठी वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला होता. यात 250 बाधितांनी सहभाग नोेंदविला. विशेष म्हणजे आज गुरुवारी यातील पाच दाम्पत्य विवाहाच्या बोहल्यावर चढणार आहे.

जागतिक एच. आय. व्ही. सप्ताहनिम्मित स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाने सहजीवनाची ओढ असणार्‍या एच.आय.व्ही संसर्गितांचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वधू वर परिचय मेळाव्यात 250 पेक्षा जास्त वधू-वरांनी आपली नावनोंदणी करून परिचय मेळाव्यामध्ये सहभाग घेतला.

या वधू-वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमात एकूण सात वधू-वरांचे विवाह जुळले. त्यापैकी पाच वधू-वरांचे येत्या गुरुवारी दि. 15 डिसेंबर रोजी दुपारी 12.35 वाजता स्नेहालय पुनर्वसन संकुल, एम.आय.डी.सी. येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती स्नेहालयाचे अध्यक्ष संजय गुगळे आणि सचिव राजीव गुजर यांनी दिली. या शुभघडीचे औचित्य साधून आपण या अनोख्या व अलौकिक अशा महत्वपूर्ण लग्न सोहळ्यात सहभागी होऊन वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावे, अशी विनंती स्नेहाधार प्रकल्पाच्या प्रमुख विद्या घोरपडे यांनी केले. दरम्यान, स्नेहालयातून एचआयव्ही बाधितांसाठी घेतलेला पुढाकाराचे नगरच्या जनतेतून स्वागत केले जात आहे.

कन्यादान करण्यासाठी पुढे या..!

सामुदायिक विवाह सोहळ्यातील वधू स्नेहालय संस्थेच्या लाभार्थी आहेत. या वधुंचे कन्यादान करण्यासाठी समाजातील संवेदनशील नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भरत कुलकर्णी यांनी केले. कपडे, भांडे, फर्निचर, कपाट, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दिवाण, सूटकेस, रुखवत सामान नवदाम्पत्यांना भेटवस्तू म्हणून देत स्वहस्ते सहयोग द्यावा, अशी विनंती स्नेहालय जनसंपर्क कार्यालयाचे कार्यकर्ते रत्ना शिंदे, महेश अग्रवाल आणि अंकिता आंबडकर, संचालक प्रविण मुत्याल यांनी केली आहे.या आवाहनाला जनतेतून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news